S. Jaishankar : परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितला सहा पैलूंवर आधारीत धोरणाचा 'भारत मार्ग'

Devendra Fadanvis : 'द इंडिया वे' या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
S. Jaishankar, Devendra Fadanvis
S. Jaishankar, Devendra FadanvisSarkarnama

S. Jaishankar : कोरोना काळातील वंदेभारत मोहिम, युक्रेन-रशिया युद्ध थांबवून विद्यार्थ्यांना मायदेशात सुरक्षीत परत आणणे, बलाढ्या राष्ट्रांचा दबाव झुगारणे यातून भारताच्या परराष्ट्र धोरणाचे (International Policy) यश स्पष्ट झाले आहे. आत्मविश्‍वास, आत्मनिर्भरता, विषयानुसार आंतराष्ट्रीय स्तरावर सहयोग, इतर देशांसाठींची भूमिका, राष्ट्रसुरक्षा आणि परदेशातील भारतीय नागरिकांची सुरक्षा या सहा पैलूंवर परराष्ट्र धोरणाचा 'भारत मार्ग' निश्‍चीत केला जाणार आहे, असे प्रतिपादन देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले.

एस. जयशंकर लिखित 'द इंडिया वे' (The India Way) या इंग्रजी पुस्तकाच्या 'भारत मार्ग' (Bharat Marg) मराठी अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते झाले. भाजपच्या विदेश विभागाचे प्रभारी विजय चौथाईवाले, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे, भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे उपस्थित होते. सरिता आठवले यांनी या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आहे.

गेल्या १० वर्षात देशाच्या परराष्ट्र धोरणात (International Policy) क्रांतीकारक बदल झाला आहे. हे माझे राजकीय वक्तव्य नाही तर, माझ्या ५० वर्षाच्या अनुभवातून सांगत आहे, असे स्पष्ट करत जयशंकर म्हणाले, "परराष्ट्र धोरण हे आंतरराष्ट्रीय सिमेवर राहिलेले नाही. ते आता आपल्या घरापर्यंत आले आहे. त्याची प्रचिती कोरोना (Corona), रशिया-युक्रेन (Russia-Ukrain war) युद्धातील परिणामांवरून लक्षात आली असेलच. जागतिकीकरणात आपला डिजीटल डेटा कुठे ठेवला जातो, हा मोठा प्रश्न सर्वांना पडत असल्याने आत हे धोरण बदलले जात आहे.

हे आहेत परराष्ट्रधोरणाचे सहा पैलू

आत्मनिर्भरता : आत्मनिर्भर झाल्याशिवाय जगात मोठे होऊ शकणार नाही. त्यासाठी मेक इन इंडिया (Make in India) मोहिम महत्वाची आहे. चीनवर अवलंबून न राहता देशांतर्गत उत्पानांची पुरवठा साखळी मजबूत करत आहोत.

आत्मविश्वास : रशिया-युक्रेन युद्धात खूप दबाव असानाही तडजोड न करताना भारताने आपली भूमिका आत्मविश्‍वासाने जगापुढे मांडली. शस्त्रखरेदी अवघड गोष्ट असतानाही एकाच वेळी अमेरिका, रशिया, फ्रान्सकडून करणे शक्य झाले.

विषयानुसार सहयोग : आंतरराष्ट्रीय स्तरावर विषयमानुसार इतर देशांना सोबत घेऊन त्यांची भूमिका कणखरणे मांडणे.

राष्ट्रसुरक्षा : दहशतवादी हल्ले झाले तेव्हा भारताने कडक भूमिका घेतली. चीनचा विरोध झुगारून सीमेवर पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत.

जागतिक भूमिका : नेपाळ, मालदीव, श्रीलंका, येमेन येथील नैसर्गिक व देशांतर्गत संकटात भारताने मदतीची भूमिका घेतली.

नागरिकांची काळजी : परदेशातील भारतीयांना सुरक्षीत वातावरण देणे यासाठी हिंमत लागते. वंदेभारत मिशनमधून कोरोनामध्ये ७० लाख तर रशिया युक्रेन युद्ध थांबवून २० हजार मुलांना भारतात आणले. कामासाठी परदेशात गेलेल्या भारतीयांना तेथील सरकारने समानतेची वागणूक द्यावी चर्चा सुरू आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी सोप्या भाषेमध्ये महाभारताल संदर्भ देत आपलं संपूर्ण परराष्ट्र धोरण मांडलं आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना आपले परराष्ट्रीय धोरण काय आहे हे समजेल. भारत हा जगाच्या पाठीवर एक अतिशय मजबूत देश म्हणून उभा राहिला आहे. भारत अमेरिका, रशियाच्या दबावाला बळी पडत नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि जयशंकर यांनी दाखवून दिले आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com