ओवेसींनी 'योगीराज'चा अर्थ सांगत पंतप्रधान मोदींचे सांगितले तीन यार

असदुद्दीन ओवेसींनी (Asaduddin Owaisi) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
 asaduddin owaisi, yogi Adityanath & Narendra modi

asaduddin owaisi, yogi Adityanath & Narendra modi

Sarkarnama

पुणे : आगामी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election-2022) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. यामुळे नेते मंडळीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. यामध्ये ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (MIM) प्रमुख तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी(Asaduddin Owaisi) यांनी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi) गृहमंत्री अमित शाह आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ (Yogi Adityanath) यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

<div class="paragraphs"><p> asaduddin owaisi, yogi Adityanath &amp; Narendra modi</p></div>
'आदित्यने माझा ताण बराच हलका केलाय';पाहा व्हिडिओ

सहारनपूर येथील सभेस संबोधित करताना औवेसींनी "मोदींचे तीन यार-नाटक, दंगल आणि अत्याचार" असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच, मोदी के तीन यार म्हणत ट्विटरवर टीकेचा व्हिडिओ ट्विट केला आहे. यानंतर औवेसींनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सुद्धा टीका केली आणि आता शाहांना उत्तर द्यायचे आहे. आम्ही कोणाचे कर्ज बाकी ठेवत नाही, असे म्हणाले.

ओवेसी म्हणाले, "नसीमुद्दीनचे नाव घेतले मात्र, काँग्रेस पार्टी तर बोलणार नाही. नसीमचे नाव घेतले तर आमची मते मिळणार नाहीत. काँग्रेस इम्रानचे नाव घेणार नाही. समाजवादी पार्टी आझमचे नाव नाही घेणार. मात्र, आम्ही शाह आणि मुख्यमंत्री योगींना सांगू इच्छितो की, यूपीमध्ये योगी 'राज' (Raj) आहे. त्याचा अर्थ R म्हणजे रिश्वत, A म्हणजे अपराध, आणि J चा अर्थ जातीवाद, असे सांगत अमित शाह तुमचे कर्ज फिटले" अशा शब्दात त्यांनी शहा आणि योगी यांच्यावर टीका केली.

<div class="paragraphs"><p> asaduddin owaisi, yogi Adityanath &amp; Narendra modi</p></div>
पराभवानंतर अजितदादांचं राणेंना आवाहन; म्हणाले, मिळून कोकणचा कायापालट करू!

दरम्यान, ओवेसींनी या सभेत हरिद्वारच्या धर्मसंसदेतील वादग्रस्त वक्तव्यांचा मुद्दा उपस्थित करत ही धर्मसंसद भाजपा आणि पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने पार पडल्याचे सांगितले व देशात मुस्लिमांच्या हत्येची चर्चा होत असताना त्याविरोधात कोणी आवाज का उठवला जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. एका बाजूला कोरोना प्रादुर्भाव वाढत असला तरी येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. यामध्ये खुद्द पंतप्रधान यांनीही सहभाग घेतल्याने वातावरण अजून तापले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com