Exit Polls : भाजप 'यूपी'चा गड राखणार; दोनशेहून अधिक जागांचा अंदाज

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पुन्हा एकदा भाजपचे पारडे जड राहण्याची चिन्हे आहेत.
Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
Amit Shah, Yogi Adityanath and Narendra ModiSarkarnama

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पुन्हा एकदा भाजपचे पारडे जड राहण्याची चिन्हे आहेत. एक्झिट पोलमध्ये (Exit Polls) भाजपला (BJP) दोनशेहून अधिका जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागील 37 वर्षांत एकाही पक्षाला उत्तर प्रदेशात सलग दोन वेळा सत्ता मिळवता आलेली नाही. आता योगी सरकार विजयाची पुनरावृत्ती करेल, असा कल मतदानोत्तर कलचाचण्यांमध्ये समोर आला आहे.

उत्तर प्रदेशात दोन महिन्यांच्या कालावधीत सात टप्प्यांत निवडणूक झाली. या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि सत्ताधारी भाजपमध्ये सामना पाहायला मिळाला. तीन एक्झिट पोलमध्ये भाजपला दोनशेहून अधिक जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एनडीटीव्हीने सर्व एक्झिट पोलची सरासरी काढली असून, भाजपला 240 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समाजवादी पक्षाला (Samajwadi Party) 143, बहुजन समाज पक्षाला (BSP) 15 तर काँग्रेसला (Congress) 5 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश एक्झिट पोल सरासरी

भाजप - 240

समाजवादी पक्ष - 143

बहुजन समाज पक्ष - 14

काँग्रेस -5

Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी बंटी पाटलांचा प्लॅन ठरला

यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या आहेत. यानंतर नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेश तर डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणूक होत आहे. यातील पंजाब वगळता इतर 6 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. यातील वर्षाच्या सुरवातीला होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांतील विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. परंतु, आयोगाने नियोजित वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याचे ठरवले होते.

Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi
भाजपला मोठा धक्का! अधिवेशन काळासाठी तीन आमदारांचं निलंबन

निवडणूक आयोगाने आधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विधानसभा निवडणुका घेण्याची ठाम भूमिका घेतली होती. विधानसभेची मुदत संपण्याआधी संबंधित राज्यांत विधानसभा निवडणुका घेण्याचे घटनात्मक बंधन आयोगावर आहे. गोवा विधानसभेची मुदत 15 मार्च, मणिपूर विधानसभेची 19 मार्च आणि उत्तर प्रदेश विधानसभेची मुदत 14 मे रोजी संपत आहे. त्यामुळे ही मुदत संपण्याआधी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आयोगाने ठरवले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com