Delhi News : दिल्लीच्या राजकारणात खळबळ; केजरीवाल सरकारमधील दोन मंत्र्यांचा राजीनामा

AAP : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला आहे
Arvind Kejarival
Arvind KejarivalSarkarnama

AAP Government : देशाची राजधानी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मनीष सिसोदिया सध्या सीबीआय कोठडीत आहेत. सिसोदिया यांच्यासह सरकारमधील सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांनीही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यांमुळे दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Arvind Kejarival
Imtiaz Jalil News : बिहारचे औरंगाबाद चालते, मग महाराष्ट्रातील का नाही ?

मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना दोन दिवसांपूर्वी सीबीआयने अटक केली होती. ते सध्या पाच दिवसांच्या म्हणजे ४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडीत आहेत. सिसोदिया हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री देखील होते.

ते गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले होते. राज्य उत्पादन विभागात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यानुसार त्यांची रविवारी ईडी आणि सीबीआयकडून आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना सध्या त्यांच्यावर मद्य घोटाळा प्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली.

Arvind Kejarival
Supreme Court Hearing : ‘तुम्ही शिवसेना आहात की नाही, हे विधीमंडळात ठरू शकत नाही’ : सरन्यायाधीशांचा शिंदे गटाच्या वकिलावर बाउन्सर

दरम्यान, सत्येंद्र जैन (Satyendra jain) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. जैन यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप ठेवण्यात आला आहे. आप सरकारमधील आरोग्यमंत्री असलेल्या जैन यांचा केजरीवाल यांनी राजीनामा घेतला नव्हता.

दिल्ली सरकारमधील दोन मंत्र्यांना अटक झाल्यानंतरही ते राजीनामा का देत नाही? अशी चर्चा सुरु होती. अखेर या दोन्ही बड्या मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी स्वीकारला आहे. सिसोदिया आणि जैन यांच्या राजीनामा केजरीवाल सरकारला मोठा धक्का मानला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com