मुख्यमंत्री वगळता भाजपच्या मंत्रिमंडळातील सर्वजण पूर्वाश्रमीचे 'काँग्रेसवासी'

BJP | Congress | Goa Government : बहुतांश जणांनी निवडणुकीपूर्वी केला होता भाजप प्रवेश
Goa Government
Goa Government Sarkarnama

पणजी : गोव्यात सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या नेतृत्वात भाजपचे (BJP) सरकार सत्तेवर आले. या मंत्रिमंडळात सांवत यांच्याशिवाय अन्य ८ आमदारांनाही शपथ घेतली. मात्र मंत्रिमंडळाचे एक वैशिष्ट्य आता समोर येत आहे. ते म्हणजे ज्या ९ जणांनी शपथ घेतली, त्यापैकी मुख्यमंत्री सावंत सोडल्यास इतर ८ मंत्र्यांचा मूळ राजकीय पक्ष काँग्रेसच असल्याचे समोर आले आहे.

सावंत सरकारमध्ये मंत्री म्हणून विश्वजीत राणे, माविन गुदिन्हो, रवी नाईक, सुभाष शिरोडकर बाबूश मोन्सरात, गोविंद गावडे, निलेश काब्राल आणि रोहन खंवटे या ८ जणांनी शपथ घेतली. यात विश्वजीत राणे, माविन गुदिन्हो, रवी नाईक, सुभाष शिरोडकर आणि बाबूश मोन्सरात हे सर्वजण काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. हे यापूर्वी काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री देखील होते.

तर गोविंद गावडे यांनी मागची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. परंतू त्यापूर्वी त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविली आहे. निलेश काब्राल आणि रोहन खंवटे यांनीही जरी कधी काँग्रेस पक्षाच्या निशाणीवर निवडणूक लढविली नसली त्यांची राजकीय सुरुवात ही मूळ काँग्रेस पक्षातूनच झाली आहे.

याबद्दल राजकीय विश्लेषक क्लिओफात कुतिन्हो म्हणाले, हे मंत्रिमंडळ कुठल्याही कार्यक्षमतेच्या निकषावर गठित केलेले नसून राजकीय अपरिहार्यतेतून बनले आहे. सध्या भाजप हा पक्ष गोव्यात तरी ‘पार्टी विथ डिफरन्स’ राहिलेला नसून तोही आता सत्तेची गणिते पाहूनच राजकीय वाटचाल करू लागला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com