Goa Politics|भाजपात प्रवेश का केला? माजी मुख्यमंत्र्यांचा अजबगजब विधान, देव म्हणाला..

Goa Politics| गोव्यात काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
 Goa Politics|
Goa Politics|

पणजी : गोव्यात काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांची वक्तव्येही समोर येऊ लागली आहेत. काँग्रेसमधून (congress) भाजपमध्ये दाखल झालेले राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी भाजपमध्ये येण्याबाबत अजब विधान केले आहे. 'तुला जे वाटेल ते कर' असे देवाने सांगितले होते, म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश केला, असे अजबगजब विधान त्यांनी केलं आहे.

काँग्रेसमध्ये असताना आपण कधीही पक्ष सोडणार नसल्याची दिगंबर कामत यांनी शपथ घेतली होती. या चुकीची आठवण करून देत माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देतांना त्यांनी पक्ष बदल्याचा निर्णय देवाची इच्छा असल्याचे सांगितले. मी पुन्हा मंदिरात गेलो आणि तिथे देवाला विचारले की काय करावे? तेव्हा काळजी करु नको, तुला जे आवडते ते कर, असे मला देवाने सांगितले.

दरम्यान, 2019 मध्येही 15 पैकी 10 काँग्रेस आमदारांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी दिगंबर कामत यांच्याशिवाय काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना पक्षांतर न करण्याची शपथ दिली होती. मंदिरात आणि चर्चमध्येही आमदारांच्या धर्मानुसार ही शपथ घेण्यात आली.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 11 जागांवर विजय मिळवला. विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काँग्रेसमध्ये मोठी फूट पाडली होती. काँग्रेसच्या आठ आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यात गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचाही समावेश होता. दिगंबर कामत हे काँग्रेसचे गोव्यातील महत्त्वाचे नेते मानले जातात, पण त्यातही त्यांनी काँग्रेसची साथ सोडल्यामुळे पक्षाला मोठा हादरा बसल्याची चर्चा गोव्यात रंगू लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com