अभियंता तरुणीनं पुढील शिक्षणासाठी डोक्यावर उचललं रोजगार हमीचं घमेलं..!

अभियंता तरुणी पुढील शिक्षणासाठी पैसे नसल्याने रोजगार हमी योजनेच्या कामावर जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
engineering student rosy behra turns daliy wage worker for completing studies
engineering student rosy behra turns daliy wage worker for completing studies

पुरी : घरची परस्थिती बेताची आणि पुढे शिकण्याची इच्छा असल्याने रोझी बेहरा (वय २०) नावाची अभियंता तरुणी रोजगार हमीच्या कामावर जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ती गेल्या तीन आठवड्यांपासून कुटुंबीयांसमवेत मोलमजुरी करीत आहे. या कामातून मिळणाऱ्या पैशातून अभियांत्रिकीची पदवीधारक असलेल्या  या तरुणीला पदवी मिळवता येईल, अशी आशा आहे.  

रोझी ही सिव्हिल शाखेची पदविकाधारक आहे. ती ओडिशातील पुरी जिल्ह्यातील रहिवासी आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ती घराजवळच काम करत आहे. या कामातून मिळणाऱ्या पैशातून तिला महाविद्यालयाचे पदविकेचे थकीत शैक्षणिक शुल्क २४ हजार ५०० रुपये भरावयाचे आहेत. हे पैसे भरल्यानंतर पदविका प्रमाणपत्र हाती पडेल, असं तिचं म्हणणं आहे. 

रोझीने २०१९ मध्ये सिव्हिल शाखेतील पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम पूर्ण केला. परंतु, पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हता. याचबरोबर पदविका महाविद्यालयाचे २४ हजार ५०० रुपयांचे शुल्कही तिचे भरायचे राहिले आहे. त्यामुळे तिने सिव्हिल पदविकेच्या अभ्यासक्रमाचे कौशल्य वापरण्याऐवजी रोजगार हमीवर काम करण्याचे ठरवले. 

चैनपूर पंचायतीच्या हद्दीतील गोराडीपिडा गावात बांधकामाच्या कामावर रोझी मोलमजुरी करत आहे. पदविकेचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाची चौकशी केली. तिला सरकारी शिष्यवृत्तीवर बी.टेक करायचे होते. सरकारकडून शैक्षणिक शुल्क भरण्याची सोय झाली असली तरी वसतिगृह आणि महाविद्यालयाच्या बसचे शुल्क भरण्यासाठी तिच्याकडे पैसे नाहीत. शुल्काची थकबाकी असल्याने महाविद्यालयाने पदविकेचे प्रमाणपत्र देण्यासही नकार दिला आहे. 

पदविकेचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी तिने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महाविद्यालयाकडे विनंती केली. मात्र, तिच्या या प्रयत्नांना लक्ष आले नाही. बस आणि वसतिगृहाचे थकीत शुल्क भरण्यासाठी तिच्याकडे अन्य कोणताही पर्याय नव्हता. शेवटी तिने आपली बहीण, पालक आणि आजोबांसमवेत मोलमजुरी करून पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला. 

अखेर जिल्हा प्रशासनाला आली जाग 
रोझी ही पुढील शिक्षणासाठी रोजगार हमी योजनेवर जात असल्याचे समोर आल्यानंतर अखेर जिल्हा प्रशासनाला जाग आली आहे. जिल्हा प्रशासनाने रोझीच्या शैक्षणिक शुल्काचा प्रश्‍न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आर्थिक अडचणींमुळे रोझीला महाविद्यालयाचे शुल्क भरता आले नाही. तिला अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नाही. यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही तिला निश्‍चित मदत करू, असे जिल्हा प्रशासनाने म्हटलं आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com