धक्कादायक : अंकिता राहत असलेल्या फ्लॅटचा ईएमआय सुशांतच्या खात्यावरून...

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या तपासावरुन उठलेला गदारोळ कायम आहे. ईडीने या प्रकरणी चौकशी सुरू केली असून, यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे.
emi of flat ankita lokahnde stayed deducted from sushant singh rajput account
emi of flat ankita lokahnde stayed deducted from sushant singh rajput account

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता ईडीच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, सुशांतची पूर्वाश्रमीची प्रेयसी अंकिता लोखंडे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या बँक खात्यातून त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी अंकिता लोखंडे ही राहत असलेल्या फ्लॅटचा ईएमआय कपात होऊन जात होता. हा फ्लॅटही सुशांतच्या नावावर असून, तो मालाडमध्ये आहे. अंकिता आणि सुशांत हे सुमारे 6 वर्षे एकत्र राहत होते. सुशांतशी ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता हिचे उद्योगपती विक्की जैन याच्याशी प्रेमसंबंध जुळले. त्याचवेळी रिया चक्रवर्ती सुशांतच्या आयुष्यात आली. 

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी अंकिताने केली होती. याचबरोबर तिने सुशांतच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तिने अनेक वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत सुशांत आणि तिच्या संबंधाविषयी जाहीरपणे माहिती दिली होती. परंतु, आता ईडीच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, या प्रकरणातील गुंतागुंत आणखी वाढली आहे. 

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा यात समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com