दम असेल तर माझ्याशी लढा! एलॉन मस्क रणांगणात अन् थेट पुतीन यांच्याशी घेतला पंगा

रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले सुरूच असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन माघार घेण्यास तयार नाहीत.
Elon Musk and Vladimir Putin, Elon Musk challenges Vladimir Putin News
Elon Musk and Vladimir Putin, Elon Musk challenges Vladimir Putin NewsSarkarnama

मॉस्को : रशियाकडून (Russia) युक्रेनवर जोरदार हल्ले सुरूच असून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) माघार घेण्यास तयार नाहीत. जगभरातील अनेक देशांनी पुतीन यांना युध्द थांबवण्याची विनंती केली आहे. रशियावर अनेक निर्बंधही लादले आहेत. पण त्यानंतरही रशिया युक्रेनवर कब्जा करण्यासाठी दररोज पुढे सरसावत आहेत. त्यातच इलेक्ट्रिक कार निर्मितीत आघाडीवर असलेल्या टेस्ला (Tesla) कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्कनं (Elon Musk) यांनी युध्दात उडी घेतली आहे. (Russia Ukraine War)

एलॉन मस्क यांनी आपल्या कंपनीचे रशियातील कामकाज यापूर्वीच थांबवलं आहे. आता त्यांनी थेट पुतीन यांच्याशी पंगा घेतला आहे. मस्क यांनी ट्विट करत पुतीन यांना आव्हान दिलं आहे. मी पुतीन यांना आमने-सामने लढण्याचं आव्हान देतो. युक्रेनवर दाव लावला जाईल. तुम्ही लढाईसाठी तयार आहात का, असा सवाल करत मस्क यांनी थेट पुतीन यांना मैदानात उतरण्याचं आव्हान दिलं आहे. (Elon Musk challenges Vladimir Putin news updates)

Elon Musk and Vladimir Putin, Elon Musk challenges Vladimir Putin News
भाजपच्या विजयानं विरोधक हादरले; अखिलेश यांच्या मित्रपक्षाकडून सर्व समित्या बरखास्त

मस्क यांच्या या ट्विटवर एका युझरनं म्हटलं की, रशियाचे राष्ट्राध्यक्ष कोणतीही लढाई सहज जिंकतील. त्यावर लगेचच मस्क यांनी जर पुतीन एवढ्या सहजपणे पश्चिमेला अपमानित करू शकता, मग माझं आव्हान स्वीकारायला हवं. पण ते असं करणार नाही, असा टोला मस्क यांनी लगावला आहे. दरम्यान, मस्क यांच्याकडून युक्रेनला सतत मदत केली जात आहे. स्टारलिंग सॅटेलाईटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा देण्यात आली होती. तसचे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही युक्रेनच्या (Ukraine) बाजूने ठामपणे उभे राहत आहेत.

जगातील सर्वात बेस्ट स्नायपर युक्रेनच्या बाजूने

'वली' (Wali) असं या स्नायपरचं नाव आहे. वली हा फ्रेंच-कॅनडियन कॉम्प्युटर सायंटिस्ट असला तरी लक्ष्याचा अचूक वेध घेण्यात त्याचा हातखंडा आहे. तो कॅनडाच्या जॉईंट टास्क फोर्स युनिटचा जवान आहे. या युनिटच्या नावावर सर्वात लांब पल्ल्याचे लक्ष्य गाठण्याचा विक्रम आहे. जगातील नावाजलेल्या स्नायपरपैकी तो एक आहे. जवळपास तीन किलोमीटर अंतरावरूनही तो अचूक वेध घेऊ शकतो. एका दिवसांत तो जवळपास 40 जणांना टिपू शकतो.

अफगाणिस्तानसह अन्य देशांमध्येही त्यांनी विशेष मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे. 2009 ते 2011 या कालावधीत त्याने अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर आता तो युक्रेनमध्ये दाखल झाल्याने रशियन सैन्याचे धाबे दणाणले आहेत. मागील आठड्यातच त्याने युध्दभूमीत पाऊल ठेवल्याचे सांगितले जात आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की (Volodimir Zelenskyy) यांनी युक्रेनमधील नागरिकांसह अन्य देशांतील सैन्यालाही युध्दात युक्रेनच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

झेलेन्स्की यांच्या आवाहनानंतर वली हा युक्रेनमध्ये आल्याचे सांगितले जात आहे. याबाबत त्यांनी वर्ल्ड मीडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, युक्रेममधील लोकांना मदत करण्यासाठी मी आलो आहे. खूप चांगले वाटत आहे. रशियाकडून निरपराध लोकांवर बॉम्ब हल्ले केले जात आहेत. काही दिवसांपर्यंत मी कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये व्यस्त होतो. आता हाता बंदूक घेऊन युध्दात उतरलो आहे. हे माझ्या पत्नी आवडले नव्हते. पण तीही कठोर निर्णय घेत मी युक्रेनमध्ये आलो, असे वलीने सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com