Raj Thackeray यांची महाराणींच्या निधनावर पोस्ट:..काटेरी राजमुकुट उतरला !

Queen Elizabeth II Dies : आता नवीन युग सुरू होतंय ? का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय हे बघणं कुतूहलाच असेल.
Raj Thackeray, Queen Elizabeth
Raj Thackeray, Queen Elizabethsarkarnama

मुंबई : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी (Queen Elizabeth II Dies) गुरुवारी निधन झाले. एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ब्रिटनसह जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एलिझाबेथ द्वितीय यांना एक पोस्ट ट्विट करून अभिवादन केले आहे.

राज ठाकरे यांनी या पोस्ट मध्ये त्यांनी लोकशाहीचे वारे वाहत असलेल्या जगात आपल्या राजघरणाबद्दल ब्रिटीशांमध्ये आणि जगाचे देखील कुतुहल टिकवले आणि 70 वर्ष राजमुकूट सांभाळताना आलेल्या कठीण प्रसंगांचा देखील दाखला दिला आहे.

कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण 70 वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ 2 ह्यांच्या शिरावरून हा मुकुट उतरला, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Raj Thackeray, Queen Elizabeth
Eknath Shinde : मुख्यमंत्री म्हणाले,"चुकीला माफी नाही, शिक्षा होणारच.."

"ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांचे निधन झाले. 70 वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. आणि ही 70 वर्ष कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची 70 वर्ष. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे, म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ 2 ह्यांच्यामुळे, असे गौरवउद्गार राज यांनी आपल्या पोस्ट म्हटले आहे.

राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात..

ब्रिटनच्या राजघराण्याचे लाड का पुरवायचे? मुळात त्यांची गरज आहे का? असा विचार एका बाजूला बळावत होता. त्याचवेळेस आजोबांच्या वयाच्या विन्स्टन चर्चिलसारख्या कमालीच्या लोकप्रिय आणि करिष्मा असलेल्या पंतप्रधानाला हाताळायचं, तर पुढे कमालीच्या स्वतंत्र बुद्धीच्या समवयस्क मागरिट थॅचर ह्यांच्याशी कितीही खटके उडाले तरी स्वतःचा इगो बाजूला ठेवत, संविधानाची चौकट राखणं हे कमालीचं कौशल्य एलिझाबेथ द्वितीय ह्यांनी दाखवलं. आणि म्हणून इतक्या भानगडी आणि शब्दशः ब्रिटिश राज्यघराण्याचं खाजगी आयुष्य ब्रिटिश टॅब्लॉइड्सनी चव्हाट्यावर आणून सुद्धा राणीबद्दलचं ब्रिटिशांचं प्रेम आणि जगाचं कुतूहल टिकलं. कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण 70 वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ 2 ह्यांच्या शिरावरून हा मुकुट उतरला. एलिझाबेथ 2 ह्यांचं एक युग होतं, ते संपलं. आता नवीन युग सुरू होतंय ? का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय हे बघणं कुतूहलाच असेल. एलिझाबेथ 2 ह्यांच्या स्मृतीस अभिवादन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com