Delhi MCD Mayor Election : दिल्ली MCD महापौरपदाची आज निवडणूक, आप-भाजप मैदानात

आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये सभागृहात मोठा गोंधळ झाल्याने त्यामुळं 6 जानेवारीला महापौर पदाची निवडणूक झाली नव्हती.
Delhi MCD Election
Delhi MCD Election Sarkarnama

Delhi : दिल्ली महानगरपालिकेच्या महापौर कोण याचा फैसला आज होणार आहे दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये सभागृहात मोठा गोंधळ झाल्याने त्यामुळं 6 जानेवारीला महापौर पदाची निवडणूक झाली नव्हती. ती आज होत आहे. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आपने पंधरा वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपचा पराभव केला. या निवडणुकीत आपला १३४ तर भाजपला १०४ जागा आणि कॉंग्रेसला 9 जागा मिळाल्या.

शैली ओबराय या आपच्या महापौर पदाच्या उमेदवार आहेत. तर मोहम्मद इकबाल हे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत. तर रेखा गुप्ता या भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार असून त्या तिसऱ्यांदा महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. याशिवाय त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षाही आहेत. दिल्लीच्या राज्यपालांनी महापौर पदाच्या निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सत्या शर्मा यांची पीठासीन अधिकारी म्हणून निवड केली आहे.

Delhi MCD Election
Bhagatsingh koshyari : राज्यपालांनी इच्छा व्यक्त केली : आता निर्णय पंतप्रधान मोदींच्या हाती

दरम्यान नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच 6 जानेवारीला सुरुवातीला सर्व नगरसेवकांना शपथ दिली जाणार होती. पण सत्या शर्मा यांनी उपराज्यपाल नियुक्त 10 स्वीकृत नगरसेवकांना शपथ देण्याचा निर्णय घेतला. आपने या निर्णयाला विरोध करत जनतेतून निवडून आलेल्या नगरसेवकांना आधी शपथ देण्याची मागणी केली. पण भाजपनेही याला विरोध केल्यामुळे दोन्ही पक्षाचे नगरसेवक आमनेसामने आणि मोठा गदारोळ झाला. राज्यपाल नियुक्त 10 स्वीकृत सदस्य भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप आपने केला.

दरम्यान, महापौर निवडणूकीत 274 सदस्य करणार मतदान करणार असून या निवडणुकीत 250 लोकनिर्वाचित सदस्यासह 7 लोकसभा खासदार, 3 राज्यसभा खासदार आणि उपराज्यपालांनी नामनिर्देशित केलेले 14 आमदार मतदान करणार आहेत.

प्रथमदर्शनी भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही दिल्लीच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी दिल्याने ही निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. भाजप ऐन वेळी काहीही करू शकते. या भीतीने आप बहुमत असतानाही जपून पावलं टाकताना दिसत आहे. दरम्यान दिल्ली महापालिकेच्या 6 सदस्य असलेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजपचे २ सदस्य सहज निवडून येऊ शकतात. पण भाजपने तिसराही उमेदवार दिल्याने भाजप काय करणार असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com