Bjp Vs Aap : दिल्ली महापौरपदाची निवडणूक आता सर्वोच्च न्यायालयात !

Polical News : भाजप जबरदस्तीनं एमसीडीच्या खुर्चीवर जबरदस्तीने बसली आहे.
AAP news
AAP news Sarkarnama

Delhi Mayor Election News : दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये सभागृहात मोठा गोंधळ झाल्यानं 6 जानेवारीला महापौरपदाची निवडणूक करण्यात आली नव्हती. त्यानंतर 24 जानेवारीला देखील गोंधळामुळं महापौर पदाचा तिढा कायम राहिला होता. याच पार्श्वभूमीवर आपने अखेर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आम आदमी पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवार डॉ. शैली ओबेरॉय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

दिल्ली महानगरपालिका निवडणूकीत आपने १५ वर्षापासून सत्तेत असलेल्या भाजपचा पराभव केला होता. आपला निवडणूकीत १३४ तर भाजपला १०४ जागा आणि कॉंग्रेसला 9 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यानंतर महापालिकेत आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यात सभागृहामध्ये मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे 6 जानेवारीला महापौरपदाची निवडणूक झाली नव्हती. त्यानंतर 24 जानेवारीला देखील गोंधळामुळं ही निवडणूक पार पडली नाही.

यामुळे आपनं आता महापौरपदाच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भाजप जबरदस्तीनं एमसीडीच्या खुर्चीवर जबरदस्तीने बसली आहे.

AAP news
Maharashtra Politics: ''...म्हणून शरद पवारांबद्दल बोलताना आदर ठेवून बोललं पाहिजे!''; राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी आपने शैली ओबराय यांना महापौर पदाची उमेदवारी दिली आहे तर उपमहापौरपदाची उमेदवारी मोहम्मद इकबाल यांना दिली आहे. तर दुसरीकडे भाजपने रेखा गुप्ता यांना महापौरपदाचं उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. गुप्ता या तिसऱ्यांदा महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून त्यांच्याकडे भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी देखील आहे.

भाजपकडे पुरेसं संख्याबळ हातात नसतानाही महापौर आणि उपमहापौरपदाचा उमेदवार जाहीर केल्यानं ही निवडणुकीतील रंगत वाढली आहे. भाजप कार्यकर्त्यांना अद्यापही पक्ष काहीतरी चमत्कार घडवून महापौर पदाची निवडणुकीत बाजी पलटवेल अशी अपेक्षा आहे. तर इतर राज्यातील सत्तास्थापनेसाठी भाजपनं केलेली ऑपरेशन्स लक्षात घेता आपकडे बहुमत असूनही जपून पावली उचलली आहे.

स्थायी समितीच्या निवडणुकीत 6 सदस्य असलेल्या असताना भाजपचे २ सदस्य सहज निवडून येणार आहेत. पण भाजपनं तिसरा उमेदवार दिल्यानं भाजप काही चमत्कार घडवून आणेल का अशी चर्चा दिल्लीच्या राजकारणात रंगली आहे.

AAP news
Telangana Politics : राज्यपालांशी वाद विकोपाला; मुख्यमंत्री ध्वजारोहणालादेखील आले नाहीत

काय आहे प्रकरण ?

महापौरपदाच्या निवडणूकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिल्लीच्या राज्यपालांनी सत्या शर्मा यांची पीठासीन अधिकारी म्हणून निवड केली आहे.6 जानेवारीला सुरुवातीला सर्व नगरसेवकांना शपथ दिली जाणार होती. मात्र, पिठासीन अधिकारी सत्या शर्मा यांनी उपराज्यपाल नियुक्त 10 स्वीकृत नगरसेवकांना शपथ देण्याचा निर्णय घेतला. याला आपने विरोध करत अगोदर जनतेतून निवडून आलेल्या नगरसेवकांना शपथ देण्याची मागणी केली. आणि सभागृहात मोठा गदारोळ झाला होता. आणि त्यानंतर २४ जानेवारीला देखील महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान गदारोळ उडाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com