निवडणूक आयोगाने तारखा जाहीर करण्याच्या काही तास आधी ममतांचा 'मास्टरस्ट्रोक'

निवडणूक आयोगाकडून आज पाच राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
before election commission schedule mamata banerjee makes big announcement
before election commission schedule mamata banerjee makes big announcement

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून आज पाच राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांत विधानसभेच्या निवडणुका 27 मार्च  ते 29 एप्रिल या कालावधीत होणार आहेत. निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा करण्याआधीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे. शहरी रोजंदारी मजुरांच्या वेतनात घसघशीत वाढ करण्याची घोषणा त्यांनी केली. 

पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस सत्तेत असून ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूलला 294 पैकी 211 जागा मिळाल्या होत्या. तर डावे पक्ष व काँग्रेसचे 76 उमेदवार निवडूण आले. भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपने सत्तापालट करण्यासाठी जोर लावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 28 जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. सध्या तृणमूल विरुध्द भाजप असेच चित्र दिसत आहे. तर डावे पक्ष व काँग्रेसची आघाडी या निवडणुकीतही कायम राहणार आहे. 

निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याआधी ममता बॅनर्जींनी मोठी घोषणा केली. राज्यातील रोजंदारी मजुरांच्या वेतनात राज्य शहरी रोजगार विकास योजनेअंतर्गत मोठी वाढ करण्यात आली आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगाल शहरी रोजगार योजनेअंतर्गत रोजंदारी मजुरांच्या वेतनात वाढ करताना मला आनंद होत आहे. याचा लाभ एकूण 56 हजार 500 कामगारांना होणार आहे. यात अकुशल 40 हजार 500, अर्धकुशल 8 हजरा आणि कुशल 8 हजार कामगार आहेत. अकुशल कामगारांचे वेतन प्रतिदिन 144 रुपयांवरुन 202 रुपये, अर्धकुशल कामगारांचे वेतन 172 वरुन 303 रुपये आणि कुशल कामगारांचे (नवीन श्रेणी अंतर्भूत केली आहे) वेतन 404 रुपये करण्यात आले आहे. 

मनरेगा अंतर्गत ग्रामीण भागातील अकुशल आणि अर्धकुशल कामगारांप्रमाणे शहरी कामगारांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. यासाठीची आर्थिक तरतूद चालू आणि पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात करण्यात येईल, असे ममतांनी स्पष्ट केले आहे. ही घोषणा ममतांनी शहरी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. 

निवडणूक तारखा : 
मतदान : पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पा 17 एप्रिल, सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिल, आठवा टप्पा  29 एप्रिल 

मतमोजणी : 2 मे 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com