Karnataka Election : निवडणूक आयोगाची काँग्रेस पक्षाला नोटीस; काय आहे कारण ?

Sonia Gandhi : हुबळीतील सोनिया गांधींचे वक्तव्यावरून वाद
Mallikarjin Kharge
Mallikarjin KhargeSarkarnama

ECI notice to Mallikarjun Kharge : कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ मध्ये काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसने ट्विटरवर कर्नाटकच्या सार्वभौमत्वाबाबत पोस्ट टाकली आहे. त्यावरून भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यानंतर निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस पाठवली आहे.

या सोशल मीडिया पोस्टवर निवडणूक आयोगाने खर्गे यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. या पोस्टमधील वक्तव्य सोनिया गांधी यांचे असल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक आयोगाने सोशल मीडिया पोस्टबाबत धोरण स्पष्ट करण्यास आणि त्यात सुधारणा करण्याबाबतही खर्गे यांना सांगितले आहे.

Mallikarjin Kharge
Chandrashekhar Bawankule : पवारांचा राजीनामा ही तर नौटंकी; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

कर्नाटकातील (Karnataka) हुबळी येथे सोनिय गांधी यांनी ६ मे रोजी सभा घेतली होती. रॅली संपल्यानंतर काँग्रेस पक्षाने (Congress) आपल्या सोशल मीडियावर एक ट्विट केले. त्यात 'काँग्रेस संसदीय पक्षाच्या (सीपीपी) अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून कर्नाटकच्या साडेसहा कोटी जनतेला कडक संदेश. कर्नाटकची विश्वासार्हता, सार्वभौमत्व आणि अखंडता काँग्रेस कधीही धुळीला मिळू देणार नाही,' म्हटले आहे. मात्र, सोनिया गांधी यांनी असे काहीही बोलले नसल्याचे काँग्रेस प्रवक्ते सांगत आहेत.

Mallikarjin Kharge
Mamata Banerjee : मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; पश्चिम बंगालमध्ये 'द केरळ स्टोरी'वर घातली बंदी

काँग्रेसच्या या पोस्टवरून भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. सार्वभौमत्वाबद्दल बोलून सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी देशाच्या संविधानाचा अवमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. यासाठी सोनिया गांधी यांनी देशाची जाहीर माफी मागावी. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, जितेंद्र सिंह आणि पक्षाचे नेते अनिल बलूनी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने सोमवारी (ता. ८) निवडणूक आयोगाची भेट घेत कारवाईची मागणी केली.

Mallikarjin Kharge
BJP News : 20 मे पूर्वीच होणार भाजपच्या नव्या जिल्हाध्यक्षांची निवड; काय असेल वयोमर्यादा? बावनकुळेंनी स्पष्ट सांगितले

काय म्हणाल्या सोनिया गांधी ?

कर्नाटकातील हुबळी येथे ६ मे रोजी सोनिया गांधी यांची शेवटची सभा झाली. त्या निवडणूक प्रचारादरम्यान सोनिया गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले होते. त्या म्हणाल्या की, "कर्नाटकची प्रतिष्ठा, सार्वभौमत्व किंवा अखंडतेला काँग्रेस कोणालाही धोका निर्माण करू देणार नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com