Election Commission News : पूर्वेकडील तीन राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले..; या तारखांना होणार मतदान

Election News : त्रिपुरा १६ फेब्रुवारी मतदान होणार आहे, तर मेघालय आणि नागालॅंड येथे २६ फेब्रुवारी मतदान होणार आहे.
  election
election sarkarnama

Election Commission News : पूर्वकडील नागालॅंड मेघालय आणि त्रिपुरा या तीनही राज्याच्या विधानसभेचा कार्यकाळ मार्चमध्ये संपत आहे. या तीनही राज्यात अडीच लाख नवमतदार आहेत.

त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सर्व राज्यांचे निकाल 2 मार्च रोजी जाहीर होतील.

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २१ जानेवारी रोजी निघणार आहे. तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० जानेवारी आहे.

मेघालय नागालॅंड निवडणुकीची अधिसूचना 31 जानेवारी रोजी निघणार आहे तर अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही 7 फेब्रुवारी आहे. नाव मागे घेण्याची तारीख त्रिपुरा - 2 फेब्रुवारी तर मेघालय-नागालॅंड- 10 फेब्रुवारी आहे.

केंद्रीय निवडणुक आयोगाने (Election Commission) आज या तीनही राज्यांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली. प्रत्येकी ६०- ६० जागांवर ही निवडणुक होत आहे. मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत माहिती दिली.

तीनही राज्यांतील 376 मतदान केंद्रे महिला कर्मचारी हाताळतील. तीन राज्यांत 62.8 लाख मतदार आहेत. निवडणुक आयोगाच्या ३७६ महिला कर्मचाऱ्यांच्या या मतदान प्रक्रियेत समावेश आहे.

  election
Delhi Assembly News : आमदाराने विधानसभेत झळकवले लाचेच्या नोटांचे बंडल

निवडणूक आयोगाच्या कर्मचारी दूर्गम भागात कशा पद्धीृतीने मतदान प्रक्रिया राबवितात, याबाबतचा माहितीपट यावेळी दाखवण्यात आला.

तीनही राज्यांतील 376 मतदान केंद्रे महिला कर्मचारी हाताळतील. तीन राज्यांत 62.8 लाख मतदार आहेत. निवडणुक आयोगाच्या ३७६ महिला कर्मचाऱ्यांच्या या मतदान प्रक्रियेत समावेश आहे.

तिन्ही राज्यांमध्ये 9 हजार 125 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. ग्रामीण भागात 2018 च्या तुलनेत 82% अधिक मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.

तिन्ही राज्यांमध्ये बहुमताचा आकडा 31 आहे. तिन्ही राज्यांमध्ये महिला मतदारांचा सहभाग जास्त आहे, येथे निवडणूक काळात हिंसाचाराच्या घटना आजपोवेतो कमीच राहल्या. निष्पक्ष निवडणुकांसाठी आम्ही व आमची यंत्रणा या ठिकाणी कटिबद्ध आहोत, असे ते म्हणाले,

मेघालय विधानसभा

  • मेघालयात 2018 मध्ये 59 जागांवर निवडणूक झाली होती

  • काँग्रेसला २१ जागा मिळाल्या होत्या.

  • भाजपला 2 जागा मिळाल्या होत्या.

  • नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीईपी) 19 जागा मिळाल्या.

त्रिपुरा विधानसभा

  • 2018 मध्ये 59 जागांवर निवडणुका झाल्या.

  • भाजपने 35 जागा मिळाल्या.

  • डाव्यांचा 25 वर्षांचा बालेकिल्ला भाजपने उद्ध्वस्त केला होता.

नागालँड विधानसभा

  • सध्या नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे सरकार आहे.

  • NDPP 2017 मध्ये अस्तित्वात आला.

  • 2018 मध्ये निवडणूकपूर्व युती केली होती.

  • एनडीपीपीने 18 तर भाजपने 12 जागा जिंकल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com