ठरलं! निवडणूक आयोग करणार मोठी घोषणा; आज मॅरेथॉन बैठकांचे सत्र

Election commission : निवडणूक आयोगाच्या २ महत्वाच्या उचस्तरीय बैठका
Elections

Elections

Sarkarnama

दिल्ली : उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) आणि गोव्यासह (Goa) ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका वेळेवर घेण्याासाठी राजकीय पक्ष आग्रही असून केंद्रीय निवडणूक आयोगही याबाबात सकारात्मक आहे. त्यामुळे उद्या निवडणूकांच्या तारखांबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापुर्वी आज विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या २ महत्वाच्या उचस्तरीय बैठका होणार आहेत. यात कोरोना परिस्थितीचा आणि निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

आजच्या पहिल्या उच्चस्तरीय बैठकीत निती आयोगाचे सदस्य आणि कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष व्हि. के. पॉल, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण हे सहभागी होणार आहेत. यात राजेश भुषण आयोगासमोर देशातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत एक सादरीकरण करणार आहेत. सोबतच निवडणूक आयोग व्हि. के. पॉल आणि राजेश भुषण यांच्या उपस्थितीमध्ये ओमिक्रॉनचा धोक्यात निवडणुका कशा घ्यायच्या, काय काळजी घ्यावी लागेल, कोणती मार्गदर्शक तत्वे, कोणते निर्बंध लागू करायचे यावर चर्चा करणार आहे.

<div class="paragraphs"><p>Elections</p></div>
इंधनदरवाढीचा भडका; कझाकिस्तानमध्ये अध्यक्षांचे घरचं पेटवले...

तर दुसऱ्या बैठकीत गृहमंत्रालयाचे अधिकारी सहभागी होणार आहेत. या दोन्ही बैठकांमध्ये देशातील आणि त्यातही ५ राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे. मतदानाच्या दोन टप्प्यांमधील अंतर, सुरक्षा व्यवस्थेवरील ताण या सगळ्यांबाबतही चर्चा होणार आहे. या दोन्ही बैठकीनंतर उद्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

<div class="paragraphs"><p>Elections</p></div>
पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत त्रुटी; पंजाब सरकारनं घेतला मोठा निर्णय

देशात एकीकडे कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होतोय आणि दुसरीकडे पाच राज्यांतील विधानसभांची मुदत संपत आहे. मात्र अशा परिस्थितीमध्येही सगळ्याच राजकीय पक्षांनी निवडणूक वेळेवर घ्यावी असा आग्रह धरल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी यापुर्वीच स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगही निवडणुकांसाठी सकारात्मक असल्याची माहिती आहे. त्यामुळे निवडणुका वेळेवर होणार हे स्पष्ट आहे. मात्र जाहीर सभा आणि रोड शोवर निर्बंध घातले जातील अशी माहिती आयोगाच्या सूत्रांनी कालच दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com