योगी, ओवैसींसाठी निवडणूक आयुक्तांचा इशारा : भडकविणारी भाषणे केल्यास...

5 states elections : ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा
Asaduddin Owaisis-Yogi Adityanath
Asaduddin Owaisis-Yogi AdityanathSarkarnama

नवी दिल्ली : देशात ५ राज्यांच्या निवडणुकांची (5 states elections) घोषणा झाली असून एकूण ७ टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. यात उत्तरप्रदेशमध्ये ७ टप्प्यात, पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये एका टप्प्यात तर मणिपूरमध्ये २ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यासाठी १४ जानेवारीला अधिसुचना निघणार असून १० मार्चला मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे पुढचा दिड महिना आता देशात राजकीय पक्षांचा धुरळा उडणार आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाने यावेळी भडकविणारी भाषण करणाऱ्या नेत्यांना गंभीर इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना भडकविणारी भाषण करणाऱ्यांवर काय कारवाई करणार? असा प्रश्न विचारला होता. कारण बऱ्याचदा अशा नेत्यांवर कारवाई होत नाही, निवडणुकीनंतर हे नेते सुटून जातात दिसून येतात. त्यावर उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले, आम्ही अशा नेत्यांवर गुन्हा दाखल करु, तसेच त्यांच्यावर कारवाई न झाल्यास संबंधित जिल्हाधिकारी आणि इतर निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारू असा इशारा दिला.

Asaduddin Owaisis-Yogi Adityanath
किती ही येवो कोरोना; वेळेतच होणार विधानसभा निवडणुका

कोरोनामुळे सार्वजनिक प्रचारावर मोठे निर्बंध

मात्र यंदा निवडणुकांवर कोरोनाचे सावट असल्याने निवडणुक आयोगाने काही महत्वाचे निर्णय घेतले असून काही महत्वाचे निर्बंध लागू केले आहेत. यात सर्व मतदान केंद्रांवर मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच सर्व पक्षांना जेवढे शक्य असेल तेवढा प्रचार ऑनलाईन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचीही विनंती करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मतदानाची मुदत १ तासाने वाढवण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त रोड शो, पदयात्रा, सायकल रॅली, बाईक रॅली, नुक्कड सभा, कोपरा सभा यांच्यावर १५ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर परिस्थिती पाहुन निर्णय घेणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. सोबतच निकालानंतर उमेदवारांच्या विजयी रॅलीवरही बंदी घालण्यात आली आहे. डोअर टु डोअर कॅम्पेंनिगलाही ५ लोकांनाच जाता येणार असल्याचेही निर्बंध निवडणूक आयोगाने लागू केले आहेत.

Asaduddin Owaisis-Yogi Adityanath
बिगुल वाजला! उत्तर प्रदेशात 7 टप्पे, मणिपूर 2 तर पंजाब, गोवा, उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान

एकूणच निवडणूक आयोगाने या निवडणुका जाहीर करताना बरीच काळजी घेतल्याचे बघायला मिळत आहे. देशात गतवर्षी पार पडलेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांनंतर रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली होती. खुद्द मद्रास उच्च न्यायालयाने याबाबतचे निरीक्षण नोंदवले होते. न्यायालय म्हणाले होते, कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोग एकहाती जबाबदार आहे. देशात आकडेवारीने सर्वोच्च टोक गाठलेले असताना निवडणूक सभांना परवानगी दिल्यामुळे न्यायालयाने आयोगावर सणकून टीका करत आयोगाच्या अधिकाऱ्यांवर कदाचित हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा, असे मत नोंदवले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in