राजांच्या मदतीला कमलनाथ..निवडणूक आयोग पुन्हा तोंडघशी पडण्याची चिन्हे

मुख्यमंत्र्यांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त टिप्पणीवरुन तमिळनाडूतील राजकीय वातावरण तापले आहे. यात आता कमलनाथ प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
election commission faces challenge in action against dmk leader a raja
election commission faces challenge in action against dmk leader a raja

चेन्नई : तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्याबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त टिप्पणीवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. अखेर निवडणूक आयोगाने या प्रकरणी द्रमुकचे नेते ए.राजा यांना 48 तास प्रचार करण्यास बंदी घातली असून, त्यांचा स्टार प्रचारकाचा दर्जाही काढून घेतला आहे. मात्र, ही कारवाई निवडणूक आयोगाला महागात पडण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते कमलनाथ यांच्यावरील अशाच कारवाईवरुन आयोग तोंडघशी पडला होता. 

राजांच्या वादग्रस्त वक्तव्याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे खुलासा मागितली होता. आता निवडणूक आयोगाने त्यांच्यावर थेट कारवाई करीत त्यांना दणका दिला आहे. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्याबद्दल राजांनी केलेले विधान असभ्य असून, मातृत्वाचा अपमान करणारे आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. हा आचारसंहितेचा भंग असल्याने आयोगाने राजांना 48 तास प्रचार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 

मध्य प्रदेशात मागील वर्षी झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांवेळी माजी मंत्री व भाजपच्या महिला उमेदवाराबद्दल बोलताना काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन गदारोळ उडाला होता. या प्रकरणी निवडणूक आयोगाने कमलनाथ यांचा स्टार प्रचारक हा दर्जा काढून घेतला होता. कमलनाथ यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देत आयोगाला खडे बोल सुनावले होते. राजा यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिल्यास कमलनाथ प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

मागील वर्षी कमलनाथ प्रकरणी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. निवडणूक आयोगाला स्टार प्रचारकांच्या यादीतून नाव वगळण्याचा कोणताही अधिकार नाही, असे सांगत सरन्यायाधीशांनी आयोगाच्या निर्णयाला त्यावेळी स्थगिती दिली होती. स्टार प्रचारकांच्या यादीतून नाव वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला कुणी दिला? हा अधिकार आयोगाचा आहे की पक्षाच्या नेत्याचा? राजकीय पक्षाचा नेता कोण असेल हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? स्टार प्रचारक आयोगच ठरवणार की राजकीय पक्ष, असे प्रश्न उपस्थित करीत सरन्यायाधीशांनी आयोगाला धारेवर धरले होते.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com