शिवसेनेला मोठा धक्का : सुहास कांदेंचे मत बाद; मतमोजणीला आयोगाची परवानगी

Rajya Sabha election result Maharashtra | : शिवसेनेला मोठा धक्का
MLA Suhas Kande
MLA Suhas KandeSarkarnama

नवी दिल्ली : तब्बल ६ तासांच्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर अखेरीस आक्षेप घेण्यात आलेल्या ५ मतांपैकी केवळ शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले आहे. घडी न घालता मतपत्रिका बाहेर आणणे, आपल्या पक्ष प्रतोदासह मतपत्रिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतोदाला दाखविणे हे भाजपचे आक्षेप निवडणूक आयोगाने मान्य केले असून त्यांचे मत बाद ठरविण्यात आले आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, मंत्री यशोमती ठाकूर, अपक्ष आमदार रवी राणा आणि भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे मत वैध ठरवण्यात आले आहे. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीला परवानगी दिली आहे. आता मतमोजणीला सुरुवात झाली असून पुढच्या २ तासांमध्ये निकाल स्पष्ट होण्याचा अंदाज आहे.

(Rajya Sabha election Latest news Maharashtra)

राज्यसभा निवडणुकीचे (Rajya Sabha Election) मतदान संपल्यानंतर मतमोजणी सुरु होण्यापूर्वी भाजपने महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्या मतदानावर भाजपने आक्षेप नोंदवला होता.

या तीन आमदारांनी आपल्या मतपत्रिका मतदान करण्याआधी आपल्या पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधी व्यतिरिक्त इतरांना जाहीरपणे दाखविल्या, त्यामुळे यांची मते संपूर्ण बाद करावीत अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने केली होती. सुरुवातीला राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपने घेतलेला हा आक्षेप फेटाळून लावला होता. मात्र त्यावर भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अपिल केले. त्यामुळे त्यावर निर्णय होईपर्यंत मतमोजणी सुरू होणार नाही, हे स्पष्ट झालं होतं. (Rajya Sabha Election 2022 News)

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, मुख्तार अब्बास नक्वी, गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाळ व पक्षनेते ओम पाठक यांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या कार्यालयाच तळ ठोकून बसले होते. भाजपच्या या तक्रारीची दखल घेत आयोगाने तिघांच्या मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरण तसेच निवडणूक अधिकाऱ्यांचा अहवाल मागवून घेतला होते. त्यामुळे आघाडी सरकार निवडणूक आयोग काय निकाल देते याकडे डोळे लावून बसली होती. (Rajya Sabha Election 2022 News)

या दरम्यान शिवसेनेने भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) आणि अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या मतदानावर आक्षेप घेतला. याबाबतची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली. मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका निवडणूक प्रतिनिधीकडे दिल्याचा आक्षेप घेतला आहे. राणा यांनी मतदानावेळी हनुमान चालिसाचे पुस्तक दाखवल्याचा आक्षेप नोंदवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com