नंदिग्रामध्ये फेरमतमोजणीस नकार देणारा निवडणूक अधिकारी आता ममतांच्याच संरक्षणात! - election commission directs state to provide security to officer | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

नंदिग्रामध्ये फेरमतमोजणीस नकार देणारा निवडणूक अधिकारी आता ममतांच्याच संरक्षणात!

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 मे 2021

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवण्याची हॅटट्रिक केली असली तरी नंदिग्राममध्ये त्यांचा पराभव झाला आहे. 

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवण्याची हॅटट्रिक केली असली तरी नंदिग्राममध्ये त्यांचा पराभव झाला आहे. नंदिग्राममध्ये अतिशय अटीतटीच्या लढतीत भाजपचे सुवेंदू अधिकारी जिंकले होते. या निकालावरुन मोठा गदारोळ झाला होता आणि फेरमतमोजणीची तृणमूल काँग्रेसची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली होती. आता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या मतमोजणी अधिकाऱ्याला राज्य सरकारनेच संरक्षण दिले आहे.  (election commission directs state to provide security to officer)

नंदिग्राममधील मतमोजणीबद्दल तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. तसेच, तृणमूलची फेरमतमोजणीची मागणीही फेटाळण्यात आली होती. यामुळे या मतमोजणी अधिकाऱ्याला लक्ष्य केले जाईल, अशी भीती निवडणूक आयोगाला वाटत आहे. यामुळे आयोगाने राज्य सरकारला याबाबत निर्देश दिले आहेत. नंदिग्राममधील मतमोजणी अधिकाऱ्याला राज्य सरकारने संरक्षण पुरवावे, असे आयोगाने म्हटले आहे. या अधिकाऱ्यांना  आणि त्यांच्या घरीही संरक्षण देण्यात आले आहे. 

या अधिकाऱ्यावर दबाव आणण्यात आला होता आणि त्याच्या कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती, असे ममतांनी म्हटले होते. अधिकाऱ्यावर दबाव आणल्यामुळेच त्याने फेरमतमोजणीस नकार दिला, असा दावाही ममतांनी केला आहे. या अधिकाऱ्याने एसएमएस करुन वरिष्ठांकडे मदत मागितली होती, असेही ममतांनी म्हटले होते. 

हेही वाचा : भाजप अॅक्शन मोडवर : मोदींचा राज्यपालांना फोन तर नड्डा तातडीने बंगालला

पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचे भाजप स्वप्न भंगले आहे. राज्यातील एकूण 292 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 212 मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी या सत्ता स्थापन करीत आहेत. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती. अखेर ममतांची बंगाली अस्मिता भाजपवर भारी पडली आहे.  

भाजप प्रचंड ताकदीने या निवडणुकीत उतरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अनेकांनी प्रचारासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. मोदींच्या सभा, शहांचे रोड शो यामुळे भाजपची हवा तयार करण्यात यश आले होते. परंतु, निकाल पाहता राज्यातील जनतेने भाजपला नाकारल्याचे दिसत आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख