एकनाथ शिंदेंची खेळी धनुष्यबाण गोठवणार? ठाकरेंची कोंडी करण्याची तयारी

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना खासदारांचा पाठिंबा मिळाल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे
Uddhav Thackeray Latest Marathi News
Uddhav Thackeray Latest Marathi News Sarkarnama

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात 'आवाज कोणाचा' अशी डरकाळी वर्षानुवर्षे फोडणाऱ्या शिवसेनेसमोर (Shivsena) आता 'पक्ष कोणाचा' हा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. लोकसभेत अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता मिळविल्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आता शिवसेनेवरच दावा ठोकला आहे. शिंदे गटाच्या खासदारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून, आपल्याच गटाला 'शिवसेना' म्हणून मान्यता द्यावी, अशी विनंती केली आहे.

शिवसेनेवरील वर्चस्वाचा मुद्दा आता आयोगाच्या दारात पोहोचल्याने सन १९६६ मध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासूनच या पक्षाची अविभाज्य ओळख बनलेले दनुष्य बाण हे चिन्ह पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे रहाणार का, याकडे लक्ष लागले आहे. पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह आपल्याकडेच रहावे यासाठी ठाकरे गटाने यापूर्वीच आयोगाककडे धाव घेतली आहे.

Uddhav Thackeray Latest Marathi News
Eknath shinde गटाकडून गुंता वाढवण्याची शक्यता!

विधानसभेतील आमदारांनी शिवसेनेपासून वेगळा गट स्थापन केल्यानंतर किमान १२ खासदारांनीही संसदेत वेगळा गट स्थापन केला आहे. लोकसभाध्यक्षांनी त्याला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यताही दिली. मात्र, आम्ही शिवसेना सोडली नसून पक्षातच कायम असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परवा (ता.१८) रात्रीपासून दिल्लीत तळ ठोकून होते.

किमान तब्बल १६ तास महाराष्ट्र सदनातील आपल्या दालनातच थांबलेले शिंदे यांनी काल सायंकाळी सदन सोडले व आपले पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या निवासस्थानी जाऊन १२ खासदारांसोबत दीर्घ बैठक घेतली. नंतर हे सारे महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषदेसाठी आले होते. त्यावेळीच मुख्यमंत्र्यांनी लोकसभेच्या अपेक्षित निर्णयानंतरची पुढील रणनीती आखल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठाकरे यांच्याकडून बंडखोरांवर कारवाई सुरू झाल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे यांच्या नेतृत्वातील कार्यकारणी बरखास्त केल्याची घोषणा करत स्वत: ची नवीन कार्यकारणी घोषित केली. त्यानंतर शिंदे गट आता शिवसेनेवर दावा करणार असल्याची चर्चा खरी असल्याचे या पत्रावरून स्पष्ट झाले. शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन राहुल शेवाळे यांना गटनेतेपदी नेमण्याची मागणी केली होती. त्यासाठी पत्रदेखील दिले गेले. रात्री उशिरा लोकसभा सचिवालयाकडून राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी नेमणूक झाल्याची घोषणा करण्यात आली होती.

त्यानंतर रात्री तातडीने निवडणूक आयोगाला शिंदे गटाच्या खासदारांकडून हे पत्र सोपवण्यात आले. या पत्रात १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचे म्हटले असले तरी त्याचा तपशील दिलेला नसल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र 'विधानसभा व लोकसभेतील बहुमताच्या आधारावर खरी शिवसेना आपणच असून पक्षाच्या धनुष्य बाण या निवडणूक चिन्हावरही आपलाच हक्क आहे, असा शिंदे गटाने दावा ठोकला आहे.

Uddhav Thackeray Latest Marathi News
Hingoli : सुभाष वानखेडे पुन्हा शिवसेनेत ; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन

आयोग काय निर्णय घेणार?

तज्ज्ञांच्या मते या परिस्थितीत निवडणूक आयोगाककडे काही ठळक पर्याय आहेत.

अ) शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविणे व दोन्ही गटांना नवीन चिन्ह देणे. त्या परिस्थितीत ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण होईल कारण धनुष्यबाण ही सिवसेनेची कित्येक वर्षांपासूनची ओळख आहे.

ब) सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी सादिक अली वरूध्द निवडणूक आयोग, या प्रकरणात दिलेल्या निकालाच्या आधारावर दोन्ही गटांना असलेल्या लोकप्रतीनिधींच्या पाठिंब्याची खात्री करून आयोग, असली शिवसेना कोणाची? याचा निर्णय देईल, असा एक मतप्रवाह आहे.

क) मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूर्वी आयोगाला हे प्रकरण मार्गी लावावे लागेल. त्या स्थितीत एक तर एका गटाच्या बाजूने निर्णय देणे किंवा दोन्ही गटांना वेगवेगळी पक्षमाने व वेगवेगळी चिन्हे देण्याचा निर्णय आयोग घेऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in