शिवसेनेचे किती खासदार संपर्कात; एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले

शिवसेनेच्या (Shivsena) खासदारांची दिल्लीमध्ये बैठक झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे
Cm Eknath Shinde
Cm Eknath ShindeSarkarnama

नवी दिल्ली : चाळीस आमदारांना सोबत घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले. या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यातच आता आमदारांप्रणाणेच शिवसेनेचे (Shivsena) अनेक खासदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. या विषयी त्यांनी दिल्लीमध्ये मोठे वक्तव्य केले आहे.

शिवसेनेचे किती खासदार तुमच्या संपर्कात आहेत, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला होता. यावर शिंदे म्हणाले, मी शिवसेनेच्या कुठल्याही खासदाराला भेटलेलो नाही. संपर्काचे म्हणाल तर मी मुख्यमंत्री असल्याने खासदार रोजच संपर्कात असतात. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, शिंदेंच्या संपर्कात नक्कीच एक खासदार आहे, तो म्हणजे श्रीकांत शिंदे.

शिंदे अधिक स्पष्टता देत म्हणाले, कुठलाही खासदार माझ्या संपर्कात नाही. अनेक जण भेटीला येत असतात. तसेच ची चर्चा सुरु आहे. त्याप्रमाणे खासदारांची कुठली बैठक झाली, याबाबत मला काही माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.

Cm Eknath Shinde
शिवसेनेच्या नाराज १० खासदारांची कृपाल तुमानेंच्या घरी बैठक झाली...? तुमाने स्पष्टच म्हणाले...

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. शपथविधीनंतरचा दोघांचाही हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. या दौऱ्यात त्यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तर आज सकाळी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. ते आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

या भेटीगाठींदरम्यान दोघांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेवून या दिल्ली दौऱ्यामागील उद्देश स्पष्ट केला. मुख्यमंत्री एकनथ शिंदे म्हणाले, या पत्रकार परिषदेमागे असा कोणताही राजकीय उद्देश नव्हता. पण राज्याच्या विकासासाठी केंद्राची मदत, सहकार्य आणि आशीर्वाद गरजेचा, म्हणून शपथ घेतल्यानंतर दिल्लीत आलो. ज्या राज्याला केंद्राची मदत मिळते ते राज्य वेगाने प्रगती करते, असेही शिंदे म्हणाले.

Cm Eknath Shinde
संजय राठोडांचे मंत्रिमंडळात कमबॅक निश्चित! एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितले...

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?

याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही भेट सदिच्छा भेट आहे. आषाढी एकादशी झाली की मुंबईत बसून चर्चा करू आणि तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर देऊ. पण अधिवेशनापूर्वी हा विस्तार होईल. अधिवेशन हे पुढे ढकलले जाणार का यावर बोलतांना शिंदे म्हणाले, १८ तारखेला राष्ट्रपतीपदाची निवडणूक असल्याने अधिवेशन मागे-पुढे होऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in