शिंदे-ठाकरेंची फोनवरुन चर्चा : पवार, राऊतांच्या कारभारावर बोट; भाजपसोबत सरकारची मागणी

Eknath Shinde | Shivsena | Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या संयमाचा बांध फुटला...
Eknath Shinde | Shivsena | Uddhav Thackeray
Eknath Shinde | Shivsena | Uddhav ThackeraySarkarnama

सुरत : तब्बल १२ तासांनंतर अखेर शिवसेनेतील (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामध्ये संवाद सुरु झाला आहे. ३५ आमदारांसह एकनाथ शिंदे सुरतला गेल्यापासून पक्षनेतृत्वाशी झालेला त्यांचा हा पहिलाच संवाद होता. सुरतमध्ये भेटीला आलेल्या शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या फोनवरुन शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. या संवादादरम्यान शिंदेंच्या संयमाचा बांध फुटलेला पाहायला मिळाला. तसेच यावेळी बोलताना खासदार संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही नाराजी व्यक्त केली. (Eknath Shinde Live Updates)

भाजपसोबत सरकारची मागणी :

एकनाथ शिंदे यांची सर्वात प्रमुख मागणी आहे ती महाविकास आघाडीच्या सरकारमधून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन करावं. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर बोलताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्ता नको, अशी शिंदे यांची ठाम भूमिका आहे. मला मुख्यमंत्री पदाची लालसा नाही, सरकारमध्ये मंत्रिपद नाही दिले तरी चालेल, मात्र, पण हिंदूत्वाच्या मुद्द्यावर युती व्हावी बोलणं यात गैर काय? असा सवाल त्यांनी केला आहे. (Political crisis in Maharashtra)

गटनेतेपदावरुन हटवलं :

एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे यांच्या संवादावेळी गटनेतेपदावरुन हटवल्याने शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मी शिवसेनेचं चांगलं चिंततो. मी कोणताही स्वतंत्र पक्ष काढला नाही, कोणत्या कागदावर सही केली नाही, पक्षाविरोधात काही बोललो नाही, वेगळा गट स्थापन केला नाही, तरीही माझं गटनेतेपद का काढण्यात आलं? माझ्यावर ही कारवाई का? २४ तासांत तुमच्यासाठी एवढा वाईट झालो का? असा सवाल शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला असल्याची माहिती मिळतं आहे. (Eknath Shinde latest News)

संजय राऊतांवर नाराजी :

याशिवाय संजय राऊत यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेवरही शिंदे यांनी आक्षेप नोंदवला आहे. संजय राऊत माझ्याशी फोनवर चांगलं बोलतात. त्यांचं माझ्याशी सकाळपासून तीन ते चार वेळा बोलणं झालं. प्रत्यक्षात फोनवर ते व्यवस्थित बोलतात. मात्र माध्यमांसमोर ते माझ्यावर टीका करत आहेत. शिंदे यांनी शिवसेना आमदारांचं अपहरण केले, शिवसेना आमदारांना गुजरातमध्ये मारहाण करण्यात आली, त्यांना जीवे मारलं जाऊ शकते, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला असल्याच शिंदे यांनी ठाकरेंच्या निदर्शनास आणून दिले.

अजित पवारांच्या काराभारावरही शिंदेंचे बोट :

संवादामध्ये एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या कारभारावही बोट ठेवले. निधीच्या बाबतीत अडीच वर्षांच्या काळात राज्याची सारी सूत्रे राष्ट्रवादीकडे अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असल्याची वागणूक मिळत आहे. ही गोष्ट कानावरही घातली आहे. तरीही त्यावर तोडगा निघाला नाही आणि गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादी विशेषत: अजित पवार यांनी आपल्याच पक्षाचा अजेंडा राबविला आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थखात्याने असल्याने ते शिवसेनेच्या आमदारांना जाणीवपूर्वक टाळून, त्याच मतदारसंघातील तेही राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांना मदत करीत असल्याचे शिवसेनेच्या आमदारांनी वारंवार निदर्शनास आणून दिले आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=432570808878734&id=100077638503525

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com