'एकनाथ शिंदे देवाच्या रुपात भेटले' : बिहारच्या मराठी कुटुंबाला रातोरात दिले जीवनदान

Eknath Shinde | Shivsena | Shrikant Shinde : "शिंदे साब को मान गये" अशा भावना जाधव कुटुंबीय व्यक्त करत आहेत.
Eknath Shinde News, Shivsena Latest Marathi News
Eknath Shinde News, Shivsena Latest Marathi Newssarkarnama

(Shivsena | Eknath Shinde Latest News)

सातारा : बिहारमधील पाटणा येथे महाराष्ट्रातील गुरसाळे (ता. खटाव, जि. सातारा) येथील अमोल जाधव यांच्या कुटुंबीयांना काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रातोरात जीवनदान मिळवून दिले. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या रुपात आपल्याला देव भेटला असल्याचे सांगत "शिंदे साब को मान गये" अशा भावना जाधव कुटुंबीय व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री शिंदेंव्यतिरिक्त खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde), आमदार अनिल बाबर (Anil Babar), शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचेही जाधव यांनी आभार मानले. (Shivsena | Eknath Shinde Latest News)

नेमके काय घडले?

बिहार मधील पाटणा येथे गुरसाळेमधील अमोल जाधव यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहे. शनिवारी मध्यरात्री २ वाजता त्यांच्या राहत्या घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट होऊन, कुटुंबातील चारही लोकांना मोठ्याप्रमाणात भाजले. त्यांना तात्काळ पाटणा येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु तिथल्या डॉक्टरांनी संबंधित रुग्णांना पुढील उपचारांसाठी तातडीने पुणे किंवा मुंबई येथे भाजलेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या स्पेशल दवाखान्यात हलविण्यास सांगितले. त्यानंतर या कुटुंबाच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला आणि Air Ambulance मिळणेसाठी प्रयत्न सुरू केले.

यावेळी Air Ambulance कंपनीने एकावेळी एकच रुग्ण नेता येईल असे सांगितले. त्यामुळे जाधव कुटुंबाचे नातेवाईक हतबल झाले. हवाई वाहतुकीचा होणारा लाखोंचा खर्च कोठून करणार? हा गंभीर प्रश्न समोर ठेवून शनिवारी दिवसभर अश्रू ढाळत बसले होते. यावेळी नातेवाईकांनी त्यांच्या भागातील अनेकांकडे मदतीचा हात मागितला पण यश येऊ शकले नाही. दुसऱ्या बाजूला हवाई वाहतुकीचा अमाप खर्च नातेवाईकांचा मानसिक ताण वाढत चालला होता.

Eknath Shinde News, Shivsena Latest Marathi News
रोहित पवारांनी मुख्यमंत्री शिंदेना केली विनंती : माझ्या कामाचे श्रेय तुम्ही घ्या पण ते काम करा

त्याचवेळी जाधव यांच्या एका नातेवाईकाने आमदार अनिल बाबर यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क केला. संपर्क झाल्यावर नातेवाईकांनी सर्व घटना मुख्यमंत्र्यांना सांगितली. त्यानंतर तात्काळ सुत्रे फिरण्यास सुरुवात झाली. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी प्रथम आणि नंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना अतितात्काळ शासकीय Air Ambulance मिळण्यासाठी विनंती केली. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शासकीय Air Ambulance उपलब्ध होऊ शकली नाही.

अतिशय नाजूक वेळ असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनाविलंब स्वखर्चातून २ Air Ambulance बुक केल्या. इतकेच नाही तर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना संबंधित कुटुंबाला, रविवारचा दिवस उजाडण्याचा आत पुण्यात आणण्याचे आदेश दिले.

त्यानंतर रविवारचा दिवस उजाडण्याच्या सुमारास पाहिले विमान दाखल झाले. जखमीपैकी ११ वर्षांच्या मुलास घेऊन आज सकाळी ६ वाजता स्पेशल विमान (Air ambulance) पुण्यातील लोहगाव विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर दुसऱ्या जखमी पैकी १२ वर्षांच्या बालकास घेऊन दुसरे विशेष विमान (Air Ambulabce) सकाळी ११ वाजता विमानतळावर दाखल झाले. दोन्ही जखमी रुग्णांना शिवसेना वैद्यकीय मदत समन्वयक राजाभाऊ भिलारे व युवराज काकडे यांच्या सहाय्याने पुण्यातील सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे उपचार सुरू आहेत.

Eknath Shinde News, Shivsena Latest Marathi News
ठाकरेंच्या शिवसेनेवर काँग्रेसची कुरघोडी; नाना पटोलेंनी केला मोठा दावा

जाधव कुटुंबीयांनी मानले मुख्यमंत्री शिंदे आणि मदत करणाऱ्या हातांचे आभार...

यावेळी वेळेवर मदत मिळाल्याने रुग्णाचे नातेवाईक यांनी विमानतळावरुनच साश्रुनयांनी मुख्यमंत्री शिंदे आणि मदत करणाऱ्या हातांचे आभार मानले. आमच्याकडे शब्द नाहीत, माणसांत देव असतो, हे आज आम्हाला समजल्याची भावना व्यक्त करत होते. "नाव, गाव, पत्ता, ना ओळख, ना कोणाची शिफारस, काहीही माहिती नसताना शिंदे साहेबांनी आम्हाला मदत केली. मदतीसाठी आम्ही खूप लोकांना बोललो पण मदत होऊ शकली नाही. परंतु शिंदे साहेब आमच्या मदतीला धावून आले. आज आम्ही एकनाथ शिंदे यांच्या रूपाने साक्षात विठ्ठल पाहिला" अशी भावना रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करत होते.

तसेच मुलं बरी झाल्यानंतर त्यांना घेऊन शिंदे साहेबांना भेटण्यास घेऊन जाणार असल्याचेही रुग्णाच्या आईने सांगितले. आमच्या मूळ गावी हे समजल्याने सर्व गावकऱ्यांनी शिंदे साहेबांचे आभार व्यक्त केले. तसेच बिहारमध्येही शिंदे साहेबांबद्दल स्थानिक व मराठी लोकांनी "शिंदे साब को मान गये" अशी भावना व्यक्त केल्याचे सांगितले. ही सर्व हकीकत सांगताना, रुग्णांच्या नातेवाईकांच्या अंगावर काटे व डोळ्यात पाणी येत होते. आणि जो पर्यंत आम्ही जिवंत आहोत तो पर्यंत शिंदे साहेबांच्या मदतीची परतफेड करू शकणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com