West Bengal : ममतांच्या मंत्रिमंडळात आठ नवे चेहरे; बाबूल सुप्रियो यांचीही वर्णी

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल करत आठ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
West Bengal
West Bengalsarkarnama

West Bengal : कोलकता : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल करत आठ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये माजी केंद्रीयमंत्री बाबूल सुप्रियो यांचाही समावेश आहे. सुप्रियो यांच्याशिवाय 'तृणमूल'चे स्थानिक नेते स्नेहाशिष चक्रवर्ती, पार्थ भौमिक, उदयन गुहा आणि प्रदीप मुजुमदार यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आहे.

राजभवनामध्ये आज झालेल्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये राज्यपाल ला गणेशन यांनी या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. प्रथम पाच कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर बिरभा हंसदा, विप्लव रॉय चौधरी, ताजमुल हुसैन आणि सत्यजित बर्मन यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली. हंसदा आणि विप्लव रॉय चौधरी यांच्याकडे स्वतंत्र कार्यभार सोपविण्यात आला आहे.

West Bengal
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंचे आक्रमक भाषण

झारग्राम येथील आमदार असलेले बिरभा हंसदा हे संथाल समुदायाचे नेते म्हणून ओळखले जातात. हेमताबाद येथील आमदार सत्यजित बर्मन यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर सुप्रियो यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केली होती. त्यांनी लोकसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला होता. १८ सप्टेंबर २०२१ रोजी त्यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये (Trinamool Congress) प्रवेश केला. 'तृणमूल'चे वरिष्ठ नेते सुव्रत मुखर्जी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बेलीगंज मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती त्यात ते विजयी झाले होते.

West Bengal
Ed Action : ईडीची मोठी कारवाई : नॅशनल हेराल्डच्या कार्यालयाला ठोकले टाळे

तरुण नेत्यांना संधी

मंत्रिमंडळाचा चेहरा तरुण ठेवण्यासाठी बॅनर्जी यांनी जाणीवपूर्वक तरुण नेत्यांना संधी दिल्याचे बोलले जाते. त्यामुळेच बाबूल सुप्रियो, पार्थ भौमिक आणि स्नेहाशिष चक्रवर्ती या नेत्यांना संधी देण्यात आली. या नेत्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यासाठी अभिषेक बॅनर्जी हेच आग्रही होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in