हिंदी भाषेविषयी बोलताना शिक्षणमंत्र्यांची जीभ घसरली; हिंदी भाषिक आमच्याकडे...

Tamilnadu news| Education Minister Ponmudi | इंग्रजी ही भाषा म्हणून हिंदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे
Education Minister Ponmudi | Tamilnadu
Education Minister Ponmudi | Tamilnadu

Education Minister Ponmudi news

नवी दिल्ली : तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री पोनमुडी यांनी हिंदी भाषेच्या वादात उडी घेतली आहे. ''इंग्रजी ही भाषा म्हणून हिंदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. त्यामुळे हिंदी ही ऐच्छिक असावी, मात्र अनिवार्य नसावी, अशा शब्दांत तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री पोनमुडी यांनी हिंदी भाषेबाबत वादग्रस्त विधान केले आहे. इतकेच नव्हे तर, हिंदी बोलणारे आमच्याकडे पाणीपुरी विकत असल्याचा दावाही पोनमुडी यांनी केला आहे.

Education Minister Ponmudi | Tamilnadu
'मोदी-शहांनी काही काळ राजकारण बाजूला ठेवून कश्मीरी पंडितांच्या घरवापसीवर लक्ष द्यावे'

शुक्रवारी (१३ मे) कोईम्बतूर येथील भारथिअर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पोनमुडी बोलत होते. याचवेळी त्यांनी राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील फायदेशीर पैलूंची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. पण राज्यात केवळ दोन-भाषा प्रणाली लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून सुरुवातीपासूनच शिकविली जात असताना आता हिंदी का शिकली पाहिजे, असा सवाल राज्यपाल आर.एन. रवी यांनीही असा सवाल त्यांनी केला होता.

त्यानंतर त्यांची री ओढत मंत्री पोनमुडी यांनी तामिळनाडूतील शिक्षण व्यवस्थेचे कौतुकही केले आहे. भारतातील शिक्षण व्यवस्थेत तामिळनाडू आघाडीवर आहे. तमीळ विद्यार्थी कोणतीही भाषा शिकण्यास तयार आहेत. पण हिंदी भाषा ही पर्यायी भाषा असावी, असेही त्यांनी म्हटले. तसेच, की तुम्ही हिंदी शिकलात तर तुम्हाला नोकरी मिळेल, असं हिंदी भाषिक म्हणायचे. पण असं आहे का, आता कोइम्बतूरमध्ये पाणीपुरी कोण विकतंय हे बघायला मिळेल. एके काळी असं होतं. पण आता आता इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे." .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com