नितीशकुमार सरकारची पहिली विकेट : या मंत्र्याने पदभार स्वीकारताच दिला राजीनामा

विरोधी पक्षांच्या हातात आयते कोलित
nitishkumar-mevalal-choudhri
nitishkumar-mevalal-choudhri

पाटणा : बिहारमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेल्या एनडीएने नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले खरे पण पहिल्याच तीन दिवसांत एक राजकीय विकेट गेली आहे. नितीश यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी 16 नोव्हेंबर रोजी झाला. त्यानंतर तीनच दिवसांत नवनियुक्त शिक्षणमंत्री मेवालाल चौधरी यांना राजीनामा द्यावा लागला.

विशेष म्हणजे गुरुवारीच त्यांनी पदभार स्वीकारला आणि त्याच दिवशी राजीनामा दिला. ते राजकारणात येण्याआधी राज्याच्या  फलोत्पादन विभागात कार्यरत असताना आणि कुलगुरू असताना त्यांच्यावर नोकरभरतीत भ्रष्टाचाराचे आरोप होते. त्यांच्यावर गुन्हा देखील झाला होता. आरोपीकडेच शिक्षण खाते सोपविल्याने त्यावरून विरोधी पक्षांनी टीका सुरू केली होती. सुशासनबाबू म्हणून प्रसिद्ध असलेल्या नितीशकुमार यांना मेवालाल हे मंत्रिमंडळात ठेवणे विरोधकांच्या आणि प्रसारमाध्यमांच्या टिकेनंतर अवघड बनले. 

मेवालाल चौधरी बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत जवळपास अर्धा तास चर्चा केली. या बैठकीत काय घडलं याबद्दल वेगवेगळ्या चर्चाही रंगल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवार पदभार स्वीकारला. त्यामुळे ते पदावर राहणार असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र त्यांनी राजीनामा दिला.  

मेवालाल चौधरी 2015 मध्ये पहिल्यांदा जदयूकडून आमदार म्हणून निवडून आले होते. त्याआधी त्यांनी शिक्षण देण्याचं काम केलं होतं. कुलपती असताना कृषी विद्यापीठात 2012 मध्ये सहाय्यक प्राध्यपक आणि ज्यूनिअर वैज्ञानिकांची भरती झाली होती. या नियुक्त्यांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप कऱण्यात आला होता. कृषी विद्यापीठातील भरती घोटाळ्याप्रकरणी सबौर पोलिस ठाण्यात 2017 मध्ये तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना अंतरिम जामिन दिला होता. दरम्यान, आतापर्यंत त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com