'शिकलेल्या मुलीच ‘लिव-इन’च्या शिकार' ; मोदी सरकारमधील मंत्र्यांचे वादग्रस्त विधान!

Central Ministry : अशा नात्यात राहायचं असेल तर त्याची कुठेतरी नोंदही घेतली पाहिजे.
Koushal Kishor
Koushal KishorSarkarnama

दिल्ली : श्रद्धा वालकर (Shraddha Walkar Murder News) या वसई राहणाऱ्या मुलीच्या हत्येनंतर रोज नव्या नव्या गोष्टी समोर येत आहेत. लिव ईन रिलेशनशिपमधील श्रद्धाचा जोडीदार असलेल्या आफताब पुनावाला (Aftab Poonawala) याने श्रद्धाची हत्या केली. यावरून देशातील वातावरण मात्र ढवळून निघाले. एकीकडे असे असताना मोदी सरकारमधील एका मंत्र्यांने याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शिकलेल्या मुलीच लिव इन रिलेशनशिपचा शिकार होतात, असं केंद्रीय मंत्री म्हणाले.

Koushal Kishor
Sanjay Raut On Rahul Gandhi : संजय राऊतांचे अतिशय गंभीर वक्तव्य

मोदी सरकारमध्ये मंत्री असलेले कौशल किशोर यांनी श्रद्धा वालकर या तरूणीच्या हत्येवर आपले बोलताना, वादग्रस्त विधान केले आहे. शिक्षण घेतलेल्या मुली आणि लिव इन रिलेशनशिप यांचा वेगळाच संबंध दाखवत वादग्रस्त वक्त्यव्य केले. मंत्र्यांच्या या वक्तव्यावर आता टीका होत आहे. शिवसेनेच्या राज्यसभेचे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी कौशल किशोर यांच्यावर जोरदार टीका केली.

काय म्हणाले मंत्री ?

अशा प्रकारच्या घटना या अशाच मुलींसोबत घडत आहेत, ज्या की चांगल्या शिकलेल्या असतात. ज्या काही मुलींना वाटतं की, आपणच आपल्या भवितव्याचा निर्णय स्वतःच घेऊ शकतो, ती क्षमता आपल्यात आहे, अशा विचारांच्या मुलींसोबत असे दुर्देवी प्रकार होत आहेत. लिव ईन रिलेशनशिपसारख्या नात्यात लोक का राहत आहेत? अशा लोकांना अशा नात्यात राहायचं असेल तर त्याची कुठेतरी नोंदही घेतली पाहिजे. जर अशा व्यक्तींच्या नातं त्यांच्या पालकांना मान्य असेल, तर अशा लोकांनी न्यायालयात जाऊन विवाह करावं, यानंतर एकत्र राहावं.

Koushal Kishor
राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे भाजपच्या संपर्कात?; मौनामुळे संभ्रम वाढला

शिक्षित मुलींनी असे नातं करू नये. आई वडिलांच्या निर्णयाला नाकारत, वेगळे निर्णय घेत असतील, तर यासाठी ते स्वतःच जबाबदार आहेत. मुलीं नेमकं असं का करत आहेत, या गोष्टीवर लक्ष ठेवायला पाहिजे.

18 मे रोजी श्रद्धा वालकर या तरुणीची हत्यांकांड घडल्याचे पोलिसांनी सांगितले होते. या हत्येप्रकरणी तिच्या लिव्ह इन जोडीदाराला हत्येच्या आरोपात अटक करण्यात आली. श्रद्धाचा प्रियकर आफताब पूनावाला याने तिचा गळा आवळून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले होते. श्रद्धाच्या मृत्यूनंतर शरीराचे 35 तुकडे केले. यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या शरीराचे एक एक तुकडा फेकून, तिचियी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्याने प्रयत्न केला होता. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in