ed will register fir against actress shilpa shetty husband raj kundra
ed will register fir against actress shilpa shetty husband raj kundra

मोठी बातमी : मुंबई पोलिसांनंतर राज कुंद्रा अडकला 'ईडी'च्या फेऱ्यात

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पॉर्नफिल्मची निर्मिती आणि वितरण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती आणि वितरण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनंतर आता कुंद्रा सक्त वसुली संचालनालयाच्या (ED) फेऱ्यात अडकला आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन ईडी तपास सुरू करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.   

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परकी चलन विनिमय कायद्यानुसार कुंद्राच्या विरोधात ईडी गुन्हा दाखल करणार आहे. याचबरोबर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यानुसारही त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई 26 जुलैनंतर होणार आहे. आर्थिक गुन्ह्यांशी निगडित प्रकरणांचा तपास ईडी करते. त्यामुळे ईडीकडून लवकरच या प्रकरणी कार्यवाही केली जाणार आहे.

परकी चलन विनिमय आणि आर्थिक आर्थिक अनियमितता याच्याशी संबंधित हे प्रकरण असल्यामुळे मुंबई पोलिसांनी ईडीला कळवले होते. ईडी तपास सुरू करण्याआधी मुंबई पोलिसांकडून या प्रकरणातील एफआयआर घेणार आहे. यामुळे ईडी लवकरच कुंद्राला चौकशीसाठी मुंबईतील कार्यालयात बोलावण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

कुंद्रा (वय 45) याला पॉर्न फिल्म रॅकेटप्रकरणी 19 जुलैला अटक झाली आहे. या प्रकरणात एकूण 12 आरोपी आहेत. अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन त्यांचे वितरण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. कुंद्रा याला 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कुंद्रा असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी कुंद्राकडून 48 टीबी डेटा जप्त केला असून, यात अश्लील फोटो, व्हिडीओंचा समावेश आहे. 

कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थार्प यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कुंद्राला यामध्ये मुख्य सूत्रधार दाखवले आहे. त्याच्या बँक खात्यात दर दिवशी लाखो रुपये जमा होत होते. हॉटशॉट ॲप्सद्वारे हा प्रकार चालविला जात होता, असा आरोप पोलिसांनी केला आहे. राज कुंद्रा याच्या विरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून, या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्याच्या दिशेने पोलिसांनी पावले टाकली आहेत. पॉर्न व्हिडीओ बनवून ते ऑनलाईन अपलोड करणा-या रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने राज कुंद्रा याला अटक केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com