ED Raid : अर्पिता मुखर्जी धाय मोकलून रडली ; 44 तासांच्या छाप्यात ४९ कोटींची रोकड जप्त

पार्थ चॅटर्जी व अर्पिता मुखर्जी यांना आज (शुक्रवारी) तिसऱ्यांदा वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. रुग्णालयात नेताना अर्पिताची प्रकृती बिघडली.
West Bengal SSC Scam
West Bengal SSC Scamsarkarnama

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याबाबत (West Bengal SSC Scam) ईडीकडून (ED) कारवाई सुरु आहे. तपासात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. ईडी (ED) सूत्रांच्या माहितीनुसार, हा संपूर्ण घोटाळा 1 हजार कोटींचा असण्याचा अंदाज आहे. ( Arpita Mukherjee latest news)

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री पार्थ चॅटर्जी (Partha Chatterjee) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यानंतर चॅटर्जी यांच्या सहकारी अर्पिता मुखर्जी (Arpita Mukherjee) यांना अटक केली आहे. पार्थ चॅटर्जी व अर्पिता मुखर्जी यांना आज (शुक्रवारी) तिसऱ्यांदा वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. रुग्णालयात नेताना अर्पिताची प्रकृती बिघडली. कारमधून बाहेर पडताच ती धाय मोकलून रडू लागली. यावेळी ती रस्त्यावर खालीही बसली.

काल (गुरुवारी) तिच्या घरातून 28 कोटी रुपयांच्या रोकडसह 5 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. अर्पिताला अटक केल्यानंतर डायमंड सिटी येथील तिच्या निवासस्थानातून चार अलिशान गाड्या गायब झाल्या आहेत. यातील दोन गाड्या अर्पिता मुखर्जीच्या नावावर आहेत.

ईडी सूत्रांच्या माहितीनुसार, अर्पिताने आपल्या फ्लॅटमध्ये आढळलेल्या 50 कोटींहून अधिकच्या रकमेविषयी प्रथमच मौन सोडले आहे. अर्पिताने गुरूवारी तपास यंत्रणेपुढे हा सर्व पैसा चॅटर्जींचा आहे. आपल्याला त्याची कोणतीही माहिती नाही, असे स्पष्ट केले आहे.

West Bengal SSC Scam
Smriti Irani :भाजप नेत्याची बदनामी ; कॉंग्रेसच्या तीन बड्या नेत्यांना समन्स

ईडी अर्पिताच्या जबाबाच्या आधारावर पार्थ चॅटर्जींवर पुढील कारवाई करेल. अर्पिता व पार्थ हे 2012 मध्ये एकमेकांच्या संपर्कात आले. दोघांनी संयुक्तपणे अनेक मालमत्ता खरेदी केल्या. त्याचे दस्तावेजही आढळले आहेत.

"चॅटर्जींनी चूक केली असेल तर त्यांना जन्मठेपही झाली, तर मला फरक पडत नाही. आम्ही त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. उर्वरित माहिती आताच सार्वजनिक करता येत नाही," असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

"पार्थ चॅटर्जी प्रकरणात आतापर्यंत जे काही झाले त्यावर आमची नजर होती. आम्ही त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. ते निर्दोष ठरले तरच त्यांच्यासाठी पक्षाची कवाडे खूली होतील," असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले.

या प्रकरणात केवळ शिक्षक भरतीचाच पैसा नाही, तर पार्थ चॅटर्जींचा रिअल इस्टेटमध्ये लावलेलाही पैसाही आहे. सद्यस्थितीत ईडीचे पथक आणखी 15 ठिकाणी छापेमारी करू शकते. या प्रकरणी तृणमूल आमदार माणिक भट्टाचार्य यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in