निवडणूक आयोगाच्या बैठकीला दांडी अन् माजी मुख्यमंत्र्यांच्या आईला ईडीची नोटीस 

ईडीच्या नोटीशीवरून मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
ED summons Mehbooba Muftis mother to appear in person
ED summons Mehbooba Muftis mother to appear in person

नवी दिल्ली : केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांची पुनर्रचना केली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे पूनर्रचना आयोगाचे सदस्य श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. या आयोगाशी चर्चा करण्यासाठी भाजपसह काँग्रेस व बहुतेक स्थानिक पक्ष भेटणार आहेत. पण माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या पिपल्स डेमोक्रॅटीक पार्टीने (PDP) आयोगाला नकार कळवला आहे. यादरम्यान मुफ्ती यांच्या आईला सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. (ED summons Mehbooba Muftis mother to appear in person)

ईडीच्या नोटीशीवरून मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आयोगाला भेटण्यासाठी न गेल्याने नोटीस पाठवल्याचा दावा त्यांनी केला आहे. मेहबूबा मुफ्ती यांनीच ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. पीडीपीने आयोगाची भेट न घेण्याचे ठरवल्यानंतर ईडीने माझ्या आईला समन्स पाठविले आहे. कोणत्या आरोपांसाठी आईला चौकशीसाठी बोलावले आहे, हे माहित नाही. केंद्र सरकारकडून विरोधकांवर दबाव टाकताना ज्येष्ठ नागरिकांनाही सोडलं जात नाही. NIA आणि ED सारख्या तपास यंत्रणा आता सरकारची सूड उगवण्याची साधनं झाली आहेत, असं मुफ्ती यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

दरम्यान, मुफ्ती यांच्या आई गुलशन नझीर यांना मनी लाँर्डींग प्रकरणात चौकशीसाठी बोलावल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांना येत्या 14 तारखेला कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. नझीर या जम्मू व काश्मीर चे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद यांच्या पत्नी आहेत. 

पीडीपीचे महासचिव गुलाम नबी लोन हंजूरा यांनी आयोगाच्या अध्यक्षा न्यायमूर्ती (निवृत्त) रंजना प्रकाश देसाई यांना पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्यांनी आयोगाच्या कार्यवाहीपासून पक्ष दूर राहणार असल्याचं म्हटलं आहे. आयोगाच्या चर्चेतून काहीच निष्पण्ण होणार नसून त्याचे परिणाम पूर्व नियोजित आहेत. त्यामध्ये आमच्या लोकांचे हित प्रभावित होऊ शकते. 

दुसरीकडे नॅशनल कॅान्फरन्सने आयोगाच्या सदस्यांच्या भेटीसाठी पाच सदस्यांचे शिष्टमंडळ तयार केले आहे. भाजप, काँग्रेस, नॅशनल पँथर्स पार्टी, बहुजन समाज पक्ष, जम्मू-काश्मीर पिपल्स मूव्हमेंट, आवामी नॅशनल कॅान्फरन्स, भाकपा व माकपाचे नेतेही आयोगाच्या सदस्यांची भेट घेणार आहेत. राज्यातील बहुतेक पक्षांच्या नेत्यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com