ईडीने काँग्रेस भोवतीचा फास आवळला; पाच नेत्यांना समन्स…

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात 'भारत जोडो' यात्रा जोमात सुरु आहे.
Congress
Congresssarkarnama

नवी दिल्ली : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात 'भारत जोडो' यात्रा जोमात सुरु आहे. अशातच काँग्रेसमधील (Congress) पाच नेत्याना आता ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसच्या पाच नेत्यांना ईडीने (ED) समन्स बजावले आहे.

या नेत्यांना मंगळवारी ईडीच्या दिल्लीतील मुख्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) हे यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक असताना या नेत्यांनी देणगी दिली होती. याच प्रकरणाचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने समन्स दिले आहे. यामध्ये मोहम्मद अली शब्बीर, गीता रेड्डी, सुदर्शन रेड्डी, अंजन कुमार आणि गली अनिल यांचा समावेश आहे.

Congress
ठाकरेंचे ठरले; नऊ ऑक्टोबरला शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धडधडणार तोफ

यापूर्वी ईडी काँग्रेसचे कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना नॅशनल हेराल्ड वृत्तपत्रातील कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलावले आहे. शिवकुमार यांना 7 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

तसेच नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी, आणि सोनिया गांधी यांची चौकशी झाली आहे. भारज जोडो यात्रेला कर्नाटकात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतानाच नेत्यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. कर्नाटकातील या 'भारत जोडो' यात्रेत शिवकुमार यांचाही समावेश आहे.

Congress
दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंचे प्लानिंग ठरले! शाखाप्रमुख, नेत्यांकडे मोठी जबाबदारी

ईडीकडून नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कथित मनी लाँड्रिंग संदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची सतत चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणांमुळे काँग्रेसकडून निदर्शने करण्यात आली आहेत. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित यंग इंडियनचे कार्यालय ईडीने सील केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com