खाकी सोडून खादी परिधान करणार 'हे' अधिकारी ; भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात

पोलिस दलातील दोन वरिष्ठ अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेऊन हातात 'कमळ' घेणार असल्याचे समजते.
Rajeshwar Singh, Yogi Adityanath Aseem Arun
Rajeshwar Singh, Yogi Adityanath Aseem Arunsarkarnama

लखनौ : पाच राज्याच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. देशात उत्तर प्रदेशातील निवडणुक (Uttar Pradesh Assembly) सर्वात महत्वाची समजली जाते. सध्या उत्तरप्रदेशात नेत्यांचा पक्ष बदलण्याची कार्यक्रम सुरु असताना आता सनदी अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. येथील पोलिस दलातील दोन वरिष्ठ अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेऊन हातात 'कमळ' घेणार असल्याचे समजते.

कानपुरचे पोलिस आय़ुक्त असीम अरुण (Aseem Arun) हे भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांनी आठ जानेवारी रोजी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. ते कन्नोज येथून भाजपच्या तिकिटावर निवडणुक लढविणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे लखनौ येथील अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) (ED) सहसंचालक राजेश्वर सिंह (Rajeshwar Singh) यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. त्यांनी ऑगस्टमध्ये स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दाखल केला आहे. त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. तेही भाजपच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

राजेश्वर सिंह यांनी भाजपात जाण्याबाबतच्या मुद्यावर काहीही बोलण्यास नकार दिला. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या व्हीआरएसबाबत तर्कवितर्क लावले जात होते. सिंह हे गाझियाबादच्या साहिबाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे बोलले जाते.

कोण आहेत राजेश्वर सिंह

राजेश्वर सिंह ते बी.टेक असून ते सुलतानपूर जिल्ह्यातील पाखरौली येथील रहिवाशी आहेत. ते १९९६च्या बॅचचे (तात्पुरती पोलीस सेवा) पीपीएस अधिकारी आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात पोलीस अधिकारी म्हणूनही काम केले आहे. २००९ मध्ये ते अंमलबजावणी संचालनालयात रुजू झालेत. २०१५ मध्ये त्यांचा कायमस्वरूपी ईडीच्या कॅडरमध्ये समावेश करण्यात आला. त्यानंतर त्यांना ईडी लखनऊ झोनचे सहसंचालक करण्यात आले. राजेश्वर सिंह यांच्यावरही बेहिशोबी मालमत्तेचे आरोप होते. या आरोपांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही झाली. ईडीमध्ये रुजू झाल्यानंतरच त्यांचे नाव हायप्रोफाईल प्रकरणांशी जोडले जात होते. कॉमनवेल्थ गेम्स, टूजी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळा यांसारख्या प्रकरणांच्या तपासातही राजेश्वर सिंह यांनी काम केले आहे. सहाराचे प्रमुख सुब्रत रॉय आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यावरील कारवाईमुळे ते चर्चेत राहिले आहेत.

Rajeshwar Singh, Yogi Adityanath Aseem Arun
गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता ; पुणे पोलिस जळगावात

कोण आहेत असीम अरुण

असीम अरुण हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सुरक्षा व्यवस्थेत होते. ते आयएसआयएस दहशतवादी सैफुल्लाच्या चकमकीनंतर प्रसिद्धीच्या झोतात आले होते. ते सध्या कानपुरचे पोलिस आय़ुक्त आहेत. त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. ते कन्नैाज येथील रहिवाशी असून ते येथूनच भाजपच्या तिकिटावर निवडणूक लडविणार आहेत. त्यांचे वडिल श्रीराम अरुण हे उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक होते. आयएएस अधिकाऱ्यांमध्ये प्रसिद्ध असे नाव असीम अरुण हे नाव आहे. ते एटीएस महासंचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. शनिवारी त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दिल्यानंतर ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना भेटले. त्यानंतर त्यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com