भाजपने सोनिया-राहुल यांना पुरते कोंडित पकडले... काय आहे ईडीच्या नोटिशीचे कारण?

Sonia Gandhi| Rahul Gandhi| नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अंमलबजावणी संचलनालयाने नोटीस बजावली आहे.
भाजपने सोनिया-राहुल यांना पुरते कोंडित पकडले... काय आहे ईडीच्या नोटिशीचे कारण?
Sonia Gandhi News Today, Rahul Gandhi News Today, ED Action in National Herald Case

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी आता कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनाही अंमलबजावणी संचलनालयाने (Enforcement Directorate) नोटीस बजावली आहे. आठ जून रोजी त्यांना चौकशीसाठी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (ED Action in National Herald Case)

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीवरून नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता. हे प्रकरण 2012 पासून सुरू आहे. या प्रकरणांतर्गत, काँग्रेस नेत्यांनी यंग इंडियन लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र चालवणाऱ्या असोसिएटेड जर्नल्स (एजेएल) चे अधिग्रहण करुन सुमारे 5 हजार कोटींची संपत्ती आपल्या नावे केली, असा आरोप आहे.

Sonia Gandhi News Today, Rahul Gandhi News Today, ED Action in National Herald Case
मोठी बातमी! सोनिया गांधी आणि राहुल गांधीना ईडीची नोटीस

असोसिएटेड जर्नल्सची सुरुवात कशी झाली

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 20 नोव्हेंबर 1937 रोजी असोसिएटेड जर्नल लिमिटेड (AJL) ची स्थापना केली. एजेएल ची स्थापना भारतीय कंपनी कायदा 1913 अंतर्गत विविध भाषांमध्ये वर्तमानपत्र प्रकाशित करण्यासाठी पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून करण्यात आली. एजेएलने इंग्रजीमध्ये नॅशनल हेराल्ड, हिंदीमध्ये नवजीवन आणि उर्दूमध्ये कौमी आवाज प्रकाशित करण्यास सुरुवात केली. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राचे प्रकाशन 1938 मध्ये सुरू झाले. तथापि, एजेएल कधीही नेहरूंच्या मालकीचे नव्हते. त्याला 5000 स्वातंत्र्यसैनिकांनी पाठिंबा दिला होता आणि ते त्याचे भागधारक देखील होते. त्यातही अनेक मोठे नेते होते.

2008 पर्यंत, एजेएल वर 90 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज होते. त्यानंतर यापुढे वर्तमानपत्र प्रकाशित केले जाणार नाही. असा एजेएलने निर्णय घेतला. त्यानंतर एजेएलचे प्रकाशन बंद झाले. एजेएलने मालमत्ता व्यवसायात प्रवेश केला, दिल्ली, लखनौ आणि मुंबई येथे व्यवसाय सुरु झाला. मोतीलाल व्होरा 22 मार्च 2022 पासून त्याचे अध्यक्ष आणि MD आहेत. 13 डिसेंबर 2010 रोजी, राहुल गांधी यांना यंग इंडियनचे संचालक बनवण्यात आले आणि 22 जानेवारी 2011 रोजी सोनिया गांधी त्यांच्या मंडळात सामील झाल्या. कंपनीचे उर्वरित 12-12 टक्के शेअर्स मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे आहेत.

यंग इंडिया लिमिटेडचे नक्की प्रकरण काय आहे

सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, यापूर्वी काँग्रेस पक्षाने एजेएलला 90.25 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले होते, ज्याची परतफेड केली नाही. त्यानंतर नोव्हेंबर 2010 मध्ये यंग इंडियन लिमिटेड नावाची कंपनी 50 लाख रुपयांच्या भांडवलाने सुरू केली, ज्यामध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांची 38-38 टक्के भागीदारी होती. कंपनी स्थापन करण्याचा उद्देश एजेएलवरील 90.25 कोटी रुपयांच्या दायित्वांची पूर्तता करणे हा होता. यंग इंडियनने 2011 मध्ये एजेएलचे जवळपास सर्व शेअर्स आणि मालमत्ता विकत घेतल्या आणि त्यामुळे 5000 कोटी रुपयांची संपत्ती काँग्रेस पक्षाच्या झोळीत आली. एजेएलच्या व्यावसायिक मालमत्तेचे संपादन यंग इंडियनच्या स्थापनेच्या तीन महिन्यांत कोणताही कर आणि मुद्रांक शुल्क न भरता पूर्ण करण्यात आले.

सुब्रमण्यम स्वामी यांचा आरोप

2012 मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी जनहित याचिका (पीआयएल) दाखल केली होती. त्यांनी काँग्रेस नेत्यांवर फसवणूक केल्याचा आरोप केला. नोव्हेंबर 2012 मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या आरोपांमध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांनी फसवणूक करून एजेएल मिळल्याचा आरोप केला. नॅशनल हेराल्ड, कौमी आवाजचे प्रकाशनाचे हक्कही मिळवले. त्यासाठी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातही स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्या होत्या, तर या मालमत्ता सरकारने केवळ वृत्तपत्रे छापण्यासाठी दिल्या होत्या. पण काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचा वापर करून लाखो रुपयांच्या भाड्याचे उत्पन्न घेऊन पासपोर्ट कार्यालय चालवले. अर्थात हे सर्व आरोप काॅंग्रेसने फेटाळले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in