राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ पदयात्रेची व्यवस्था पाहणाऱ्या नेत्याला ईडीची नोटीस

मला पुन्हा ईडीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. मी तपासात सहकार्य करण्यास तयार आहे,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
D. K. Shivkumar
D. K. ShivkumarSarkarnama

बंगळूर : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी ED) मनी लाँड्रिंग प्रकरणी कर्नाटक (Karnataka) प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांना समन्स बजावले आहे. सध्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 'भारत जोडो यात्रे'च्या राज्यातील दौऱ्याची व्यवस्था करण्यात व्यस्त असलेल्या शिवकुमार यांनी समन्सच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (ED notice to Karnataka Pradesh Congress president D. K. Shivakumar)

D. K. Shivkumar
एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना महाराष्ट्राबाहेरही धक्का; 8 राज्यातील शिवसेना प्रमुखांचा पाठिंबा

भारत जोडो यात्रा आणि सध्या सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान, त्यांनी मला पुन्हा ईडीसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. मी तपासात सहकार्य करण्यास तयार आहे, परंतु या समन्सची वेळ आणि मला होणारा त्रास पाहता माझी घटनात्मक आणि राजकीय कर्तव्ये पार पाडण्याच्या मार्गात अडथळा आणण्याचा या मागे उद्देश आहे, असे म्हैसूरमध्ये असलेल्या शिवकुमार यांनी गुरुवारी ट्विटद्वारे म्हटले आहे.

D. K. Shivkumar
खासदार कोल्हेंना त्यांच्या कार्यालयाकडे जाणारा रस्ताही करता आला नाही : केंद्रीय मंत्र्यांची टीका

कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाही शिवकुमार राज्यात भारत जोडो यात्रेच्या आगमनाच्या तयारीत व्यस्त आहेत. या वर्षी ऑगस्टमध्ये, दिल्ली न्यायालयाने शिवकुमार आणि इतर आरोपींना ईडीने २०१८ मध्ये नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला होता. आर्थिक तपास एजन्सीच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसच्या राजवटीत कर्नाटकात मंत्री असलेले शिवकुमार यांनी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर आणि बेहिशेबी रोकड निर्माण केली होती आणि करचुकवेगिरीसाठी इतर सहआरोपींसोबत गुन्हेगारी कट रचला गेला होता. कलंकित रोकड बंगळूर ते दिल्ली पळवली गेली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे.

D. K. Shivkumar
मोठी बातमी : पंढरपुरातील सात मजली दर्शन मंडप पाडणार; बालाजीच्या धर्तीवर दर्शनाची सोय होणार

प्राप्तीकर विभागाने २ ऑगस्ट २०१७ रोजी आरोपींच्या दिल्लीतील विविध मालमत्तांवर शोध आणि जप्तीची कारवाई केली होती, ज्यात आठ कोटी ५९ लाख ६९ हजार १०० रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली होती, असे तपास संस्थेने म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com