'ईडी'कडून अहमद पटेलांच्या जावयासह अभिनेता दिनो मोरियाची कोट्यवधीची संपत्ती जप्त - ED has attached properties of Ahmed Patels son in Law and Dino Morea | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

'ईडी'कडून अहमद पटेलांच्या जावयासह अभिनेता दिनो मोरियाची कोट्यवधीची संपत्ती जप्त

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जुलै 2021

या प्रकरणात संदेसरा बंधु आणि इरफान सिद्दीकी यांच्यामध्ये पैशांची देवाणघेवाण झाल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.

नवी दिल्ली : मनी लाँर्डींग प्रकरणात सक्तीवसुली संचालनालयाने (ED) शुक्रवारी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या जावयासह अभिनेता दिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची कोट्यवधीची संपत्ती जप्त केली. गुजरात येथील स्टर्लिंग बायोटेक समूहशी संबंधित हे प्रकरण असून ईडीकडून आज ट्विटद्वारे ही माहिती देण्यात आली. 

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, मनी लाँर्डींग कायद्याअंतर्गत (PMLA) चार जणांची संपत्ती जप्त कऱण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामध्ये अहमद पटेल यांचे जावई इरफान अहमद सिद्दिकी यांची 2 कोटी 41 लाख, दिनो मोरिया यांची 1 कोटी 40 लाख, डीजे अकील नावाने प्रसिध्द असलेले अब्दुलखलील बचूअली यांची 1 कोटी 98 लाख तर खान यांची सुमारे दोन कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. या संपत्तीची एकूण किंमत 8 कोटी 79 लाख एवढी आहे. 

हेही वाचा : कसाबलाही कायद्याद्वारे संधी मिळाली होती; अनिल देशमुख यांचा युक्तीवाद

स्टर्लिंग बायोटेक समूहाचे संचालक संदेसरा बंधूंनी बँकांकडून 14 हजार 500 कोटी रुपयांचे कर्ज घेत ते परत केले नाही. या प्रकरणात संदेसरा बंधु आणि इरफान सिद्दीकी यांच्यामध्ये पैशांची देवाणघेवाण झाल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. यामध्ये दिनो मोरिया यांचाही समावेश आहे. ज्या संपत्तीचा या देवाणघेवाणीमध्ये समावेश आहे, त्या किंमतीचे संपत्ती जप्त कऱण्यात आल्याचे समजते.

स्टर्लिंग बायोटेकचे मालक व संचालकांमधील निथीन संदेसरा, चेतनकुमार संदेसरा व दिप्ती संदेसरा 2017 मध्ये देश सोडून पळाले आहेत. त्यांना विशेष न्यायालयाने फरार आर्थिक घोटाळ्यातील फरार आरोपी म्हणून घोषित केले आहे. पंजाब नॅशनल बॅंकेची नीरव मोदी व मेहूल चोक्सीने केलेल्या फसवणूकीपेक्षा हा मोठा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख