Earthquake : नेपाळच्या भूकंपानंतर दिल्ली-यूपीसह अनेक भागात जोरदार धक्के, सहा मृत्युमुखी!

Earthquake : यापूर्वी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते.
Earthquake
Earthquake Sarkarnama

दिल्ली : नेपाळसह (Nepal Earthquake) भारत आणि चीनमध्येही आज (बुधवार ता.9) भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळ हे भूकंपाचे केंद्रबिंदू ठरले आहे. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 6.3 इतकी मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किमी खोल इतका होता. दिल्लीसह नोएडा आणि गुरुग्राममध्ये काही सेकंदांपर्यंत भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले.

दिल्लीतील अनेक भागात दुपारी 1 वाजून 57 वाजता या भूकंपाच्या धक्क्यांनी लोक अचानक जागे झाले. भूकंपविज्ञान केंद्रानुसार, त्याचा केंद्रबिंदू नेपाळ सीमेजवळ उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यापासून 90 किमी आग्नेये दिशेकडे होता. दिल्लीशिवाय उत्तराखंड, हिमाचल आणि उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काही ठिकाणी या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे मध्यरात्री अनेक लोक घराबाहेर पडले. सुमारे 10 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले आणि नोएडा आणि गुरुग्राममधूनही त्याचे धक्के जाणवले.

Earthquake
BMC : शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधात शिवसेना पुन्हा न्यायालयात!

नेपाळमध्ये सुमारे पाच तासांतील हा दुसरा भूकंप आहे. याआधी नेपाळमध्ये शेवटचा भूकंप बुधवारी रात्री 8.52 वाजता 4.9 रिश्टेल इतका नोंदवला गेला. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतर घर कोसळून सुमारे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. देशाची राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की अनेक लोक घराबाहेर पडले.

भूकंपानंतर अर्ध्या तासात #earthquake 20,000 ट्विटसह ट्विटरवर ट्रेंड करण्यास सुरुवात झाली. एवढा जोरदार भूकंप कधीच जाणवला नसल्याचे ट्विट काही लोकांनी केले. जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे अजूनही माहिती नाही.

Earthquake
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : द्वादशीवार अध्यक्ष नको म्हणून मंत्रालयातून खरंच फोन आला ?

यापूर्वी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.0 मोजण्यात आली. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली. पालघरच्या डहाणू परिसरात नोव्हेंबर 2018 पासून अनेक वेळा असे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, जे बहुतेक दुंदलवाडी गावाच्या आसपास केंद्रित होते. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील जबलपूर आणि त्याच्या लगतच्या जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com