महागाईतून जनतेची होरपळ थांबणार...निवडणुका पाच राज्यांत अन् फायदा होणार संपूर्ण देशाला!

देशात पेट्रोल, डिझेलसह एलपीजी दरवाढीचा भडका उडाला आहे. आता पेट्रोल आणि डिझेल रोज नवनवीन विक्रम नोंदवत आहे.
due to upcoming assembly election petrol and diesel prices will be stable
due to upcoming assembly election petrol and diesel prices will be stable

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असताना इंधन दरवाढ सुरूच आहे. अनेक राज्यांत पेट्रोलच्या दराने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव  वाढू लागले असले तरी आगामी काळात देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता कमी आहे. याला कारण आहे पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलने मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. अनेक राज्यांत पेट्रोल प्रतिलिटर शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या महिन्यांत सलग 12 दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.63 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.84 रुपये वाढ झाली होती. मागील तीन दिवस इंधनाच्या दरात कोणतीही वाढ झालेली नव्हती. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली आहे. 

सर्वसाधारणपणे कोणत्याही निवडणुका आल्या की पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ थांबलेली दिसते. याचबरोबर काही प्रमाणात हे दर कमी झालेलेही दिसतात. हा प्रकार मागील वेळी कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगण यासह आठ राज्यांत विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी तेल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव वाढूनही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल केले नव्हते. 

निवडणुकीचा निकाल लागताच ही वाढ पुन्हा सुरू झाली होती. तेल कंपन्यांनी निवडणुकीच्या काळातील तोटा भरुन काढण्यासोबत चालू दरातील तफावत कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दरवाढ केली होती. तेल कंपन्यां या स्वत: दर ठरवत असून, सरकारचे दर ठरवण्यावर नियंत्रण नाही, असा दावा अनेक वेळा केला जातो. पण प्रत्यक्षात निवडणुका आल्यानंतर पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखली का जाते, या प्रश्नाचे उत्तर सरकार कधी देत नाही. 

आता पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ या राज्यांसह पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाने केली असून, आगामी काळात इंधन दरवाढीच्या भडक्यात होरपळलेल्या जनतेला काही काळ दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या निवडणुकीचा  निकाल लागताच आधीपेक्षा जास्त झळ जनतेला बसेल हे मात्र, नक्की, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर 15 पैसै वाढ झाली असून, दिल्लीत पेट्रोल 91.17 रुपयांवर गेले आहे. हा दिल्लीतील आतापर्यंतचा पेट्रोलचा सर्वाधिक दर आहे. याचवेळी मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 97.57 रुपयांवर पोचला आहे. डिझेलचा दर दिल्लीत प्रतिलिटर 81.47 रुपये आणि मुंबईत 88.60 रुपयांवर गेला आहे. 

प्रमुख महानगरांतील आजचे पेट्रोल, डिझेलचे दर (स्रोत : इंडियन ऑईल) 
दिल्ली : पेट्रोल - 91.17, डिझेल - 81.47 
मुंबई : पेट्रोल - 97.57, डिझेल - 88.60 
चेन्नई : पेट्रोल - 93.11, डिझेल - 86.45 
कोलकता : पेट्रोल 91.35, डिझेल - 84.35 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com