पहिल्या लाटेमुळे कामगारमंत्री तर दुसऱ्या लाटेमुळे आरोग्यमंत्र्यांना बाहेरचा रस्ता - due to covid crisis harsh vardhan and santosh kumar gangwar resign from cabinet | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

पहिल्या लाटेमुळे कामगारमंत्री तर दुसऱ्या लाटेमुळे आरोग्यमंत्र्यांना बाहेरचा रस्ता

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार केला असला तरी 13 जणांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार झाला आहे. या पार्श्वभूमीवर 13 केंद्रीय मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. आरोग्यमंत्री असलेले हर्ष वर्धन (Harsh Vardhan) आणि कामगार राज्यमंत्री असलेले संतोषकुमार गंगवार (Santosh Kumar Gangwar) यांना कोरोना संकटाच्या हातळणीतील अपयश भोवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पहिल्या लाटेत गंगवार अपयशी 
मागील वर्षी लॉकडाउनमध्ये लाखो कामगारांच्या स्थलांतरावरून निर्माण झालेली समस्या कामगार मंत्री असलेल्या गंगवार यांना भोवली आहे. लाखो कामगार पायीच त्यांच्या मूळगावी प्रवास करीत होते तर मोठ्या संख्येने कामगार बेरोजगार झाले होते. यात कामगार मंत्रालयाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे अखेर गंगवार यांनी कोरोनाची पहिली लाट महागात पडली आहे. याचबरोबर गंगवार यांचे वय 73 आहे. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका होणार असल्याने नवीन चेहऱ्यांनी संधी देण्यासाठी त्यांना बाहेर पाठवण्यात आले. उत्तर प्रदेशातील सात नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कोरोनाची दुसरी लाट हर्ष वर्धन यांना महागात 
कोरोना महामारीच्या हातळणीतील अपयशामुळे हर्ष वर्धन यांनी आरोग्यमंत्री पद गमावावे लागले. वयाचा विचार करता हर्ष वर्धन हे 66 वर्षांचे आहेत. देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसमोर आरोग्य मंत्रालय हतबल झाल्याचे चित्र होते. देशातील रुग्णसंख्येसोबत मृत्यूचे आकडेही विक्रमी पातळीवर पोचले होते. यामुळे जागतिक पातळीवर भारताला मदतीसाठी हात पसरावे लागले होते. या सर्व बाबींचा फटका हर्ष वर्धन यांना बसला. जागतिक पातळीवर भारताची नाचक्की होत असताना देशात मोठे आरोग्य संकट निर्माण झाले होते. दररोज अनेकजण ऑक्सिजन अभावी मृत्यूमुखी पडत होते. यामुळेच एकंदरीत मोदी सरकारच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आरोग्य मंत्रालयाची धुरा स्वत: डॉक्टर असलेल्या हर्ष वर्धन यांना सांभाळता आला नाही, असे सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा : माझ्या मुलाला केंद्रीय मंत्री करा अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहा

राष्ट्रपती भवनात 7 जुलैला 43 मंत्र्यांचा शपथविधी झाला. या शपथविधीच्या आधी सहा कॅबिनेट मंत्री, स्वतंत्र कार्यभार असलेला एक राज्यमंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर या बड्या मंत्र्यासह एकूण 13 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. या 13 मंत्र्यांचे राजीनामे राष्ट्रपतींनी स्वीकारले आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा यांच्यासह कामगार राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) संतोषकुमार गंगवार, राज्यमंत्री बाबूल सुप्रियो, संजय धोत्रे, रतनालाल कटारिया, प्रतापचंद्र सरंगी,  देबश्री चौधरी, अश्विनीकुमार चौ    बे यांचा समावेश आहे. दरम्यान, कालच थावरचंद गेहलोत यांची केंद्रीय मंत्रिपदावरुन राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचाही राजीनामा स्वीकारण्यात आला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख