मुलींनो, केस मोकळे सोडाल तर खबरदार! तालिबान नव्हे हे तर भारतातच घडतंय...

महाविद्यालयाच्या आवारात मुलींना सेल्फीही काढता येणार नाही. केस मोकळे असल्यास मुलींना प्रवेश दिला जाणार नाही.
मुलींनो, केस मोकळे सोडाल तर खबरदार! तालिबान नव्हे हे तर भारतातच घडतंय...
Dress and Hair code in college girls calls it taliban law

पाटणा : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तेथील महिला हादरून गेल्या आहेत. तालिबानच्या सुरूवातीच्या राजवटीत महिलांवर अनेक बंधने लादण्यात आल्याची व अत्याचाराच्या घटना समोर आल्या होत्या. आता भारतातील एका महिला महाविद्यालयाने घेतलेल्या एका निर्णयाची तुलना तेथील विद्यार्थिनींनी तालिबानच्या शरिया कायद्याशी केली आहे. त्यामुळं हे महाविद्यालय सध्या चर्चेत आलं आहे. (Dress and Hair code in college girls calls it taliban law)

बिहारमधील भागलपूर येथे सुंदरवती महिला महाविद्यालय आहे. हे महिलांसाठीचे एकमेव महाविद्यालय म्हणून प्रसिध्द आहे. प्रशासनाने नुकताच विद्यार्थिनींच्या पेहरावाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. प्राचार्य डॉ. रमन सिंन्हा यांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार मुलींना महाविद्यालयात येताना केस मोकळे सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. एक किंवा दोन वेण्या घालूनच महाविद्यालयात यावे लागणार आहे. या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. 

त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या आवारात मुलींना सेल्फीही काढता येणार नाही. केस मोकळे असल्यास मुलींना प्रवेश दिला जाणार नाही. महाविद्यालयाच्या या निर्णयावर अनेक मुलींना नाराजी व्यक्त केली आहे. काही मुलींना या निर्णयाची तुलना तालिबानच्या शरिया कायद्याशी केली आहे. तसेच मुलींसाठी ड्रेसकोडही निश्चित करण्यात आला आहे. त्यामध्ये निळ्या रंगाची कुर्ती, पांढरा सलवार, ओढणी, पांढरे मोजे, काळे शुज असा ड्रेसकोड असेल. 

या ड्रेसकोडला मात्र, मुलींना विरोध केलेला नाही. काही विद्यार्थिनींनी हे सर्वच नियम मान्य असल्याचे सांगत त्याचे स्वागतही केलं आहे. दरम्यान, प्राचार्य सिन्हा यांनी ड्रेसकोड बदलणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. ड्रेस कोडची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मुलींना नियमांचे पालन करावेच लागेल.

सुंदरवती महाविद्यालयाच्या या निर्णयावर आता अन्य महाविद्यालयांतील विद्यार्थिनींनीही विरोध करण्यास सुरूवात केली आहे. तसेच राजकीय पक्षांनी या वादात उडी घेतली आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष दिलीप कुमार यादव यांनी प्रशासनावर टीका केली आहे. भागलपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंना याबाबत तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले. तर एनएसयूआयनेही आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.