द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित; आता घोषणेची औपचारीकताच बाकी

Presidential Election|Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मूं यांचा विजय झाल्यास त्या देशाच्या पहिल्याच आदिवासी महिला राष्ट्रपती असतील.
Presidential Election, Draupadi Murmu Latest News
Presidential Election, Draupadi Murmu Latest Newssarkarnama

Presidential Election 2022 : देशाचे 15 वे राष्ट्रपती म्हणून एनडीएकडून (NDA) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असलेल्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. या निवडणुकीत मुर्मूं यांचा विजय झाल्यास त्या देशाच्या पहिल्याच आदिवासी महिला राष्ट्रपती असतील.

दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (presidential elections results) मतमोजणी सुरू असून मुर्मू (draupadi murmus) या आघाडीवर आहेत. आता राज्यांमधील आमदारांची मतमोजणी सुरु आहे. मात्र त्यांचा विजय निश्चित मानला जात असून आता घोषणेची औपचारीकताच बाकी आहे. यामुळे भाजपकडून (BJP) देशभरात सेलिब्रेशन सुरू झालं आहे. (Presidential Election, Draupadi Murmu Latest News)

Presidential Election, Draupadi Murmu Latest News
सत्तांतरानंतर भाजपचं पहिलं सेलिब्रेशन पनवेलमध्ये...

मुर्मू यांना पहिल्या फेरीत 540 मते मिळाली होती. तर विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना 208 मते मिळाली होती. आता दुसऱ्या फेरीमध्ये मुर्मू यांना 809 मते मिळाली असून सिन्हा यांना दुसऱ्या फेरीमध्ये 329 मते मिळाली. मुर्मू यांना दोन्ही फेरीमध्ये एकून 1,349 मते मिळाली आहेत. सिन्हा (Yashwant Sinha) यांना 537 मते मिळाली. मुर्मू या तब्बल 800 मते घेत आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या फेरीची मतमोजणी संपली असून तिसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू होणार आहे. सुमारे एका तासात या फेरीचा निकाल जाहीर होऊ शकतो. यामुळे एक ते दिड तासांमध्ये देश्याच्या नव्या राष्ट्रपतींची घोषणा होऊ शकते.

तिसरी फेरीची मतमोजणी बाकी असून या फेरीतही मुर्मू आघाडी घेतील का काही उलटफेर होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, आतापर्यंत मुर्मू यांनी घेतलेल्या मतांची किंमत ही 4.83 लाख असून सिन्हा यांच्या मतांचे मूल्य 1.89 लाख झालं आहे. यामुळे मुर्मू या सहज विजय मिळवतील, असे चित्र दिसत आहे.

Presidential Election, Draupadi Murmu Latest News
..म्हणून त्यांच्या पोटात दुखतयं; आदित्य ठाकरेंनी केली बंडखोरांची पोलखोल

दरम्यान, मुर्मूंचा विजय निश्चित असल्याने दिल्ली, मुंबई आणि राज्यातील विविध शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला असून देशातील 1 लाख 35 हजार गावात या विजयाचा जल्लोष केला जाणार आहे. कारण या गावांमध्ये आदिवासी समाजाची सर्वाधिक लोकसंख्या आहे. विजयानंतर दिल्लीत भाजपकडून रोड शो करण्यात येणार असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा संबोधन करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in