द्रौपदी मुर्मू होणार देशाच्या नव्या राष्ट्रपती; यशवंत सिन्हा यांचा पराभव

Presidential Election: द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाल्याने त्या देशाच्या पहिल्याच आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्या आहेत.
Draupadi Murmu News Latest news
Draupadi Murmu News Latest newssarkarnama

Presidential Election 2022 : देशाचे 15 वे राष्ट्रपती म्हणून एनडीएकडून (NDA) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असलेल्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला आहे. त्यांनी यशवंत सिन्हा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. द्रौपदी मुर्मू यांना 812 मतं तर यशवंत सिन्हा यांना 521 मतं मिळाली आहेत. (presidential elections results)

मुर्मू या विजयी झाल्याने त्या देशाच्या पहिल्याच आदिवासी महिला राष्ट्रपती होणार आहेत. निवडणुकीची मतमोजणी सुरू असतांनाच मुर्मू (draupadi murmus) या आघाडीवर होत्या. त्या विजयी होतील असे मतमोजणी सुरु असतांना बोलले जात होते. त्यानुसार त्यांनी विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयामुळे देशभरात भाजपकडून (BJP) सेलिब्रेशन सुरू झालं आहे. (presidential elections result news update)

Draupadi Murmu News Latest news
मोठी बातमी : राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडारवर; मुंबईतील घर जप्त?

मुर्मू यांना पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती पहिल्या फेरीत 540 मते मि तर विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना 208 मते मिळाली होती. दुसऱ्या फेरीमध्ये मुर्मू यांनी आघाडी कायम ठेवत 809 मते मिळवली होती. तर सिन्हा यांना दुसऱ्या फेरीमध्ये फक्त 329 मते मिळवता आली होती. मुर्मू यांना या दोन्ही फेरीमध्ये एकून 1,349 मते मिळाली होती. तर सिन्हांना (Yashwant Sinha) फक्त 537 मते मिळाली होती. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी 812 मतं मिळवत हा विजय मिळवला आहे. तर सिन्हा यांना 521 मतं मिळवता आली.

मुर्मू यांनी दुसऱ्या फेरीतच तब्बल 800 मतांची आघाडी घेतली तेव्हाच त्यांचा विजय निश्चित झाला होता. यामुळे देशभरात भाजपकडून दुपारपासूनच सेलिब्रेशनला सुरूवात केली होती. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू आणि यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात ही थेट लढत होती. आज सकाळी 11 वाजता पासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. या निवडणुकीत मुर्मू या सुरूवातीपासूनच आघाडीवर होत्या. या निवडणुकीमध्ये 15 खासदारांची मते बाद ठरली होती.

मुर्मू या राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या पहिल्याच आदिवासी महिला असणार आहेत. त्या 24 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. देशाचे आताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलै रोजी संपत आहे.

Draupadi Murmu News Latest news
द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती; विरोधकांचे तब्बल १७ खासदार फुटले

सर्व राज्यांतील मतमोजणी झाल्यावर अखेर मुर्मू यांना 5 लाख 77 हजार 777 इतकी मतं मिळाली. विशेष म्हणजे 15 वर्षांपूर्वी 21 जुलै रोजीच देशाला प्रतिभा पाटील यांच्या रुपाने पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या होत्या.त्यानंतर आता द्रौपदी मुर्मू यांनी निवडणुकीत बाजी मारली आहे.

दरम्यान, द्रौपदी मुर्मू या ओडिशातील आदिवासी नेत्या असून त्यांनी ओडिशातील BJP-BJD युती सरकारमध्ये 2002 ते 2004 दरम्यान मंत्री म्हणून काम केलं. याचबरोबर त्यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून देखील काम पाहिल आहे. मुर्मू या ओडिशा मधील रायरंगपुरमधून प्रथम आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

त्यांचा जन्म ओडिशाच्या एका आदिवासी कुटुंबात 20 जून 1958 रोजी झाला होता. सुरुवातीला काळात त्यांनी शिक्षिक म्हणून नोकरी केली त्यानंतर राजकारणात प्रवेश केला. 1997 मध्ये राइरंगपूर नगर पंचायतीमधून नगरसेवक म्हणून विजय मिळवला होता. 2015 मध्ये झारखंडच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com