द्रौपदी मुर्मू : 21 जुलैचा दिवस ऐतिहासिक ठरणार!

Presidential election : भाजपने आम आदमी पक्षासारख्या अनेक पक्षांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
द्रौपदी मुर्मू : 21 जुलैचा दिवस ऐतिहासिक ठरणार!
Draupadi Murmu Newssarkarnama

नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा (Presidential election) निकाल जाहीर होईल तो 21 जुलैचा दिवस ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे आहेत. भारताच्या सर्वोच्च पदी आदिवासी समाजातून आलेल्या व त्याही महिला नेत्या विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने (BJP) झारखंडच्या माजी राज्यपाल व ओडिशातील ज्येष्ठ पक्षनेत्या द्रौपदी मुर्मू यांचे नाव जाहीर केले आहे. सध्याच्या बलाबलानुसार मुर्मू निवडून आल्या तर स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरतील. भाजपकडे आताच जवळपास साडेसहा- सात लाख मते पक्की मानली जात आहेत व निवडून येण्यासाठी जास्तीत जास्त 5 लाख 40 हजार मते आवश्यक असतात. (Draupadi Murmu Presidential election Latest Marathi News)

Draupadi Murmu News
Eknath Shinde live update : शिवसेनेचा ढाण्या वाघही एकनाथ शिंदेंच्या जाळ्यात

रायरंगजंगच्या रहिवासी मुर्मू व विरोधकांचे उमेदवार, तसेच हजारीबागचे माजी खासदार यशवंत सिन्हा या दोघांचेही झारखंड बरोबर घट्ट नाते असल्याने अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात निर्माण झालेले हे छोटे आदिवासी बहुल राज्य अचानक चर्चेत आले आहे. राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत असलेल्या मुर्मू यांच्या नावाची घोषणा करून भाजप नेतृत्वाने एनडीएला राज्यसभेत साथ देणारे बीजू जनता दलासारखे पक्ष पहिल्या झटक्यात आपल्या बाजूला वळवून घेतले असे नव्हे तर आम आदमी पक्षासारख्या अनेक पक्षांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

अग्नीपथ सारख्या योजनेला विरोधाची भूमिका घेणारे नितीशकुमार यांच्यासारखे नेते पहिल्या फटक्यात मुर्मू यांना पाठिंबा देतात ही सूचक घडामोड मानली जाते. या मागील भाजपची राजकीय गणितेही स्पष्ट आहेत. पुढील 2 वर्षांत 18 राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. यातील गुजरातसह किमान 5 राज्यांत अनुसूचित जमाती व आदिवासी मतदारांची लक्षणीय संख्या आहे. गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र व झारखंड या राज्यांतील विधानसभेच्या 350 हून जास्त जागांवर आदिवासी समाजाचा वरचष्णा मानला जातो. गुजरातमध्ये तर राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी आदिवासी समाज मोठी भूमिका बजावतो. मूर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड होणे हा या समाजाला फार मोठा मेसेज दिला असे होईल.

Draupadi Murmu News
उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत जायला हवं होत ; दीपक केसरकरांकडून घरचा आहेर

देशभरात अनुसूचित जमातीचे 8.9 टक्के मतदार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची गणितेही यामागे आहेत. उज्वला सारख्या योजनांमुळे ग्रामीण व गरीब वर्गातील महिला भाजपच्या मागे आहेत. उत्तर प्रदेशात तर महिला मतदारच भाजपचा विजयाचा मार्ग प्रशस्त करतात असे खुद्द पंतप्रधानांनी जाहीरपणे मान्य केले आहे. मात्र राजकीय जाणकारांच्या मते मोदी- शहा यांचे राजकारण कोणत्याच बाबतीत कोणतीही रिस्क घेत नसल्याने महिला राष्ट्रपती बनणे या एका घटनेने देशभरातील महिला वर्गाला मोठा सकारात्मक संदेश मिळू शकतो. कॅाग्रेसने 2009 च्या निवडणुकीत या `फॅक्टर` चा लाभ घेतलेला आहे. लोकसभेतील 47 जागांवर आदिवासी व अनुसूचीत जातींचेच खासदार निवडून येतात. सध्या यातील तब्बल 31 जागा भाजपच्या ताब्यात आहेत.

संख्येचे गणित

निवडून येण्यासाठी मुर्मू यांना आवश्यक ती मते - 5,39,420

भाजप आघाडीकडे सध्याचे मतांचे बळ- 5,26,420

बीजू जनता दलाची मुर्मू यांना मिळणारी मते 31,000

जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस कडील मत तूल्य 43,000

झारखंड मुक्ती मोर्चाला मुर्मू यांना मत द्यावे लागल्यास त्यांची मते - 20,000

(आम आदमी पक्ष, तेलगू देसम, अकाली दल यासारख्या पक्षांची मते सध्या गृहीत धरलेली नाहीत.)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in