द्रौपदी मुर्मू यांच्या विजयात महाराष्ट्राचा ठळक वाटा; पण मुख्यमंत्र्यांचे मिशन २०० फेल

Presidential Election Results Latest Marathi News : यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना 98 मते मिळाली.
Presidential Election, Draupadi Murmu Latest News
Presidential Election, Draupadi Murmu Latest Newssarkarnama

नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजप (BJP) आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या विजयात महाराष्ट्राने ठळक वाटा उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. मुर्मु यांना महाराष्ट्र विधानसभेतून तब्बल 181 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना 98 मते मिळाली. (Presidential Election Results Latest Marathi News)

Presidential Election, Draupadi Murmu Latest News
द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती; विरोधकांचे तब्बल १७ खासदार फुटले

या निवडणुकीत राज्यातून 283 आमदारांनी मतदान केले होते. यांना 3 लाख 16 हजार 75 तर सिन्हा यांना एक लाख 71 हजार पन्नास इतके मतमूल्य मिळाल्याचे दिसत आहे. शिवसेनेने (Shivsena) या निवडणुकीत मुर्मू यांना पाठिंबा दिला होता.

राज्यसभा सचिवालयाच्या सुत्रांनी आज रात्री दिलेल्या प्रारंभिक माहितीनुसार मुरगूड यांना 181 मते मिळाली. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाला तेव्हा शिंदे सरकारला १६४ मते मिळाली होती. तर विरोधकांकडे ९९ मते होती. आज राष्ट्रपती निवडणूक पूर्ण शिवसेना पाठिंबा दिल्यावर शिंदे गटाकडे १८५ मत अपेक्षित होती. त्यात शिंदे गटातील एक आमदार मतदान करू शकले नाही, त्यामुळे १८४ मत अपेक्षित होती.

Presidential Election, Draupadi Murmu Latest News
द्रौपदी मुर्मू होणार देशाच्या नव्या राष्ट्रपती; यशवंत सिन्हा यांचा पराभव

आता शिंदे गटाला १८१ मते मिळाली तर विरोधी गटाला ९८ मते मिळाली. त्यामुळे विरोधी पक्षाला एक मत कमी पडले. शिवसेनेने पाठिंबा दिल्यावर ही NDA १८४ आकडा गाठू शकले नाही. महाराष्ट्रात चार मत बाद झाली. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे मिशन २०० फेल झाले आहे. महाराष्ट्र विधानसभेत 288 आमदार आहेत. प्रारंभिक माहितीनुसार जो आकडा समोर येतो त्यानुसार मतदान केलेल्या आमदारांची संख्या 279 इतकी होते. भाजप व विरोधकांचे काही आमदार मतदानास उपस्थित राहू शकले नव्हते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com