Om Birla|
Om Birla|

वस्तुस्थितीची नीट माहिती घेतल्याशिवाय आरोप करु नका: ओम बिर्ला कडाडले

Loksabha news| Om Birla| असंसदीय शब्दांबाबतचे नवीन निर्देश तर 1954 पासून दिले जात आहेत, असेही बिर्ला यांनी सांगितले.

नवी दिल्ली : संसद भवनाच्या परिसरात निदर्शने, धरणे आंदोलन करण्यास खासदारांना मनाई करणाऱ्या अध्यादेशावर टीकाटिप्पणी करण्याआधी वस्तुस्थितीची नीट माहिती करून घ्यावी, अशा शब्दांत लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांनी विरोधी पक्ष व त्यांच्या नेत्यांना आज समज दिली. (Lok sabha news)

संसद भवन परिसरात सरकारच्या कोणत्याही धोरणाचा निषेध व विरोध करण्यासाठी विविध पक्षीय खासदार धरणे-निदर्शने करीत असतात. संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा हे यासाठीचे हक्काचे ठिकाण आहे. संसद अधिवेशनाच्या काळात सकाळी 10 वाजता जे मोजके पत्रकार वार्तांकनासाठी पोहोचतात त्यांची पावले प्रथम गांधीजींच्या पुतळ्याकडेच वळतात. कारण जवळपास रोज सकाळी हा आसमंत विरोधी पक्षीय खासदारांच्या घोषणाबाजीने दणाणून जात असतो. यापूर्वीच्या अधिवेशनात वादग्रस्त कृषी कायद्यांना राज्यसभेत बळजबरीने मंजुरी घेण्यात आली, तेव्हा झालेल्या गोंधळाबद्दल 13 खासदाारंना निलंबित करण्यात आले होते. तेव्हाही हे खासदार व त्यांच्या समर्थनार्थ येणारे तमाम विरोधी पक्षनेते व खासदार यांच्या वर्दळीने सकाळपासून संध्याकाळपर्यंत अक्षरशः चैतन्यमय होत असे.

 Om Birla|
कोकणातही शिवसेनेला खिंडार पडणार ? वीस नगरसेवक उदय सामंतांच्या संपर्कात

मात्र राज्यसभेच्या सचिवालयाने आज काही ओळींचा जो आदेश प्रसिध्द केला त्यामुळे राजकीय वर्तुळात टीकेचा महापूर आला. संसद परिसरात निदर्शने-धरणे-उपोषणे-घोषणा आदींना अधिवेशनाच्या काळात मनाई आहे. त्यामुळे तसे करू नये व त्यासाठी संसद भवन परिसराचा उपयोग करू नये, असे या आदेशात म्हटले आहे. विरोधकांनी यावरून मोदी सरकारवर एकच हल्लाबोल केला. काॅंग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विषगुरू,अशी नवीन उपमा दिली. दरम्यान लोकसभा सचिवालय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार . 2013 मध्ये थेट याच प्रकारचा आदेश काढण्यात आला होता. (तेव्हा केंद्रात काॅंग्रेसप्रणित यूपीए सरकार सत्तारूढ होते.)

देशातील विधीमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर लोकसभाध्यक्ष बिर्ला पत्रकारांना माहिती देण्यासाठी आले तेव्हा त्यांच्यावर या आदेशाच्या विषयावर प्रश्नांची सरबत्ती झाली. या प्रश्नांची तयारी करून आल्यासारख्या देहबोलीसह बिर्ला शांतपणे म्हणाले, हा काय किंवा कालचा असंसदीय शब्दांचा काय, हे असे आदेश पहिल्यांदाच निघाले आहेत का ? त्यावरून आताच इतका वाद का होत आहे ? गेली अनेक वर्षे अशी निवेदने संसदीय सचिवालये जारी करत आहेत. राजकीय पक्षांनी आरोप करण्याआदी वस्तुस्थिती माहिती करून घेणे कधीही श्रेयस्कर ठरेल. अधिवेशनाआधी संसद सदस्यांसाठीच्या सूचना प्रसिध्द करणे ही नियमित प्रक्रिया आहे जी 2009 पासून सुरू आहे. असंसदीय शब्दांबाबतचे नवीन निर्देश तर 1954 पासून दिले जात आहेत, असेही बिर्ला यांनी सांगितले. या यादीतील शब्दांवर बंदी आणलेली नाही. कागदांची नासाडी टाळण्यासाठी ही यादी संकेतस्थळावर टाकण्यात आली. केवळ एका संसदीय प्रक्रियेअंतर्गत ही शब्दांची यादी जारी करण्यात आल्याचेही बिर्ला म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com