सत्तेसाठी 'जय शिवाजी, जय भवानी'च्या खोट्या घोषणा ; भाजपचे टीकास्त्र

''सत्तेसाठी 'जय शिवाजी, जय भवानी'च्या खोट्या घोषणा देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत,'' असा आरोप खासदार सी. आर. पाटील (mp c r patil) यांनी केला आहे.
c r patil
c r patilsarkarnama

सिल्वासा : ''छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी काळे झेंडे फडकवणारे कुटुंब तेच होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव चौकाला देताना अडथळे आणणारे लोकही त्याच परिवाराशी संबंधित आहेत. तेच लोक आज सत्तेसाठी 'जय शिवाजी, जय भवानी'च्या खोट्या घोषणा देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत,'' असा आरोप गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नवसारीचे खासदार सी. आर. पाटील (mp c r patil) यांनी केला आहे. शिवसेनेचे उमेदवार डेलकर कुटुंबीयांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विरोध केला होता, याची आठवण पाटलांनी नागरिकांनी करुन दिली.

दादरा नगर हवेली (दानह) लोकसभा पोटनिवडणुकीच्या (dnh bypoll) प्रचारासाठी दानह प्रदेशातील मराठी समाजाची बैठक मंगळावारी पडली. या बैठकीनंतर सी. आर. पाटील माध्यमांशी बोलत होते. उपस्थित होते. नागरिकांना आश्वासन देताना पाटील म्हणाले की, भाजपाचे उमेदवार महेश गावित यांच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सिल्वासामध्ये मोठ्या आदरानं आणि अभिमानानं प्रस्थापित केला जाईल.

दादरा नगर हवेली (दानह) लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दानह प्रदेशातील मराठी समाजाच्या बैठकीत पाटील बोलत होते. भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि दानह व दीव दमणच्या प्रभारी विजया रहाटकर, भाजप उमेदवार महेश गावित, प्रदेशाध्यक्ष दीपेश टंडेल, माजी खासदार नटूभाई पटेल, सिल्वासा नगराध्यक्ष राकेश सिंह चौहान, ज्येष्ठ कार्यकर्ते फत्तेसिंह चौहान, दिग्विजय सिंह परमार, उदय सोनवणे, सुनील महाजन, प्रशांत पाटील, महेश गावित, गोविंद पाटील, आनंद सावरे, सुनील पाटील. गोपाल पाटील, डॉ नितीन राजपूत, डॉ. सी. सी. पाटील, दीपक कदम, शत्रुघ्न पाटील, नंदू शेवाळे, सुदर्शन कांबळे यांच्यासह शेकडो मराठी लोक बैठकीस उपस्थित होते.

c r patil
शिवसेनेतील 'साडेसाती' संपविण्यासाठी एकनाथ शिंदे ज्योतिषाकडे..

सी. आर. पाटील म्हणाले, "छत्रपती शिवरायांना आदर्श मानून कार्यरत राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. मी सर्वांना आश्वासन देतो की, भाजपाचे उमेदवार महेश गावित यांच्या विजयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा सिल्वासामध्ये मोठ्या आदरानं आणि अभिमानानं प्रस्थापित केला जाईल"

महेश गावित म्हणाले, "सिल्वासा ही मराठी माणसांची कर्मभूमी आहे. मराठी माणसांनी कष्टाने, मेहनतीने या प्रदेशात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे या प्रदेशावर येथील स्थानिकांइतकाच मराठी माणसांचाही अधिकार आहे. दानह प्रदेश भयमुक्त करण्यासाठी आणि घराणेशाहीचा पराभव करण्यासाठी आपण मला विजयी करा, ''

डॉ नरेंद्र देवरे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या नामकरणाला विरोध करणाऱ्या परिवाराने त्यावेळी मराठी माणसांना मारहाणही केली होती. त्या परिवाराने मराठी माणसांना कधीच सन्मानाची वागणूक दिली नाही. कायम दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न केला. या परिवाराला त्यांची जागा दाखवली पाहिजे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com