DK Shivakumar News : डी. के. शिवकुमारांचे भाकीत तंतोतंत खरे ठरले! 128 दिवसांपूर्वीच म्हणाले होते...

Karnataka Assembly Elections News : काँग्रेसला कर्नाटकचा मोठा जनादेश मिळाला असून पक्षाला 43 टक्के मतांसह 135 जागा जिंकण्यात यश आले.
Dk Shivakumar
Dk ShivakumarSarkarnama

Karnataka Assembly Elections Result News : काँग्रेसला कर्नाटकचा मोठा जनादेश मिळाला असून पक्षाला 43 टक्के मतांसह 135 जागा जिंकण्यात यश आले. गेल्या तीन दशकांतील काँग्रेसचा कर्नाटकातील 'हा' सर्वात मोठा विजय आहे. भारतीय जनता पक्षाला विधानसभेच्या केवळ 65 जागा जिंकण्यात मिळाले. तर जेडीएसच्या खात्यात केवळ 19 जागा आल्या. या संदर्भात कर्नाटकचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या संदर्भातील एक ट्वीट व्हायरल होत आहे.

डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) यांचा सोशल मीडियावर व्हायर झालेला व्हिडिओ सहा जानेवारी 2023 चा आहे. एका पत्रकाराने त्यांना आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस किती जागा जिंकेल? असा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना शिवकुमार म्हणाले होते की, '136' जागा जिंकणार आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने 135 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे शिवकुमार यांचा अंदाज खरा ठरल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Dk Shivakumar
Karnataka Assembly Elections : सात टक्के मते आणि 70 जागांचा फरक! काँग्रेसने भाजप अन् जेडीएसचे बालेकिल्ले केले उद्ध्वस्त?

कर्नाटकमध्ये (Karnataka Assembly Election) काँग्रेसच्या विजयाचे किंग शिवकुमार यांना समजले जाते. त्यांनी एक लाखापेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे. भारत जोडो यात्रेचे नियोजन त्यांनी केले होते. तसचे कर्नाटकच्या निवडणुकीचे नियोजनही त्यांचेच होते. शिवकुमार यांनी 136 जागांचा आकडा सांगितला होता. कर्नाटकात काँग्रेसला 135 जागा मिळाल्या असत्या मात्र, एका जागेवर काँग्रेसचा फक्त 16 मतांनी पराभव झाला. त्यामुळे पक्षाला 135 जागांवर विजय मिळाला आहे.

मात्र, शिवकुमार यांनी प्रत्येक मतदारसंघात व्यवस्थित रणनिती आखली होती. त्यामुळे त्यांचा आकडा हा 136 जागांचा होता. तरी काँग्रेसने ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे. सर्वज भागांमध्ये काँग्रेसला (Congress) चांगल्या जागा मिळतात. त्याचे श्रेय हे शिवकुमार यांनाच दिले जाते.

दरम्यान, मुंबई-कर्नाटक काँग्रेस पक्षाने येथे 50 पैकी 33 जागा जिंकल्या आहेत, तर भाजपची संख्या 2018 मधील 33 वरून घटून यावेळी 16 वर आली आहे. मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत काँग्रेसला तीन दशकांत प्रथमच या प्रदेशात 40 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. राज्यातील 69 लिंगायतबहुल विधानसभा जागांपैकी (ज्या जागा लिंगायत लोकसंख्येच्या 20 टक्क्यांचा आहे. यामध्ये उत्तर आणि मध्य कर्नाटकात) काँग्रेसने 45 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला 20 जागा मिळाल्या.

Dk Shivakumar
Karnataka Assembly Elections : बसवराज बोम्मईंचे धोरण बरोबर होते, पण शिंदे-फडणवीस सरकारमुळे झाली अडचण...

जुने-म्हैसूर हा भाग जेडीएसचा गड मानला जाणारा एकमेव प्रदेश आहे. जेडीएस हा नेहमीच आघाडीचा पक्ष राहिला आहे. यावेळी, काँग्रेस पक्षाने जेडीएसपेक्षा चांगली कामगिरी केली. काँग्रेसने 42 टक्के मते मिळविली. 2018 मध्ये त्यांच्या वाट्यापेक्षा सात टक्के जास्त आहे. येथे काँग्रेसने 43 जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे जेडीएसला (JDS) 26 टक्के मतांसह 64 विधानसभा जागांपैकी केवळ 14 जागा मिळाल्या. भाजपला या भागात दोन टक्के जास्त मते मिळाली, मात्र येथे 11 जागा गमवाव्या लागल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com