शिवसेनेचं ठरलं; राऊतांसह सर्व खासदारांवर सोपवली जिल्हानिहाय जबाबदारी

शिवसेनेने भाजपच्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना याबाबतचे संकेत दिले आहेत.
Shiv Sena
Shiv SenaSarkarnama

मुंबई : शिवसेनेने (Shiv Sena) भाजपच्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी खासदार व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना याबाबतचे संकेत दिले असून प्रत्येक मतदारसंघाची सविस्तर माहिती मागवली आहे. शिव संपर्क अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला जाणार आहे. सुरूवातीला भाजपचा (BJP) बालेकिल्ला असलेल्या विदर्भ व मराठवाड्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.

शिव संपर्क अभियान 22 ते 25 मार्चदरम्यान असून प्रत्येक खासदारावर एका जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामध्ये खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरची जबाबदारी देण्यात आली आहे. तर राज्यसभेतील खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांच्या खांद्यावर भंडारा जिल्ह्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

Shiv Sena
भाजपकडे कोणते मतदारसंघ, कोणते जिंकले... सविस्तर माहिती द्या! मुख्यमंत्री ठाकरेंचा 'प्लॅन'

शिव संपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेचे विचार गावागावापर्यंत पोहचवण्याचे आवाहन ठाकरे यांनी खासदार व पदाधिकाऱ्यांना केले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना ठाकरे यांनी भाजपवरही हल्लाबोल केला. भाजपला टक्कर देण्यासाठी त्यांनी भाजपची ताकद असलेल्या मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले आहे. तिथं नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबतही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिव संपर्क अभिनायतही भाजप विरूध्द शिवसेना असाच सामना पाहायला मिळणार असल्याचे संकेत आहेत.

कोणत्या खासदारांकडे कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी?

पूर्व विदर्भ -

1. नागपूर - खासदार संजय राऊत

2. चंद्रपुर - खासदार हेमंत गोडसे

3. गडचिरोली - खासदार राहुल शेवाळे, सुधीर मोरे

4. भंडारा - खासदार प्रियंका चतुर्वेदी

5. गोंदिया - खासदार राजन विचारे

Shiv Sena
'एमआयएम'च्या आघाडीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री ठाकरेंचं पहिल्यांदाच मोठं वक्तव्य

पश्चिम विदर्भ -

6. अमरावती - खासदार गजानन कीर्तिकर

7. यवतमाळ - खासदार अरविंद सावंत

8. बुलढाणा - खासदार संजय जाधव

9. अकोला - खासदार हेमंत पाटील

10. वाशिम - खासदार प्रतापराव जाधव

11. वर्धा - खासदार कृपाल तुमाने

मराठवाडा -

12. संभाजीनगर (शहर ) - खासदार विनायक राऊत

13. संभाजीनगर (ग्रामीण) - लक्ष्मण वडले, शिवसेना उपनेते

14. नांदेड - खासदार अनिल देसाई

15. परभणी - खासदार श्रीकांत शिंदे

16. जालना - खासदार श्रीरंग बारणे

17. धाराशिव - खासदार सदाशिव लोखंडे

18. बीड - खासदार ओमराजे निंबाळकर

19. लातूर - खासदार धैर्यशील माने

20. हिंगोली - खासदार संजय मंडलिक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com