कट्टर विरोधक दिग्विजयसिंहांच्या मदतीसाठी अमित शहाही धावले!

अमित शहा यांच्यासह भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) सतत टीकेचा भडिमार करणारे काँग्रेस नेते म्हणून दिग्विजयसिंह यांची ओळख आहे.
Digvijay Singh, Amit Shah
Digvijay Singh, Amit Shah

भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) सतत टीकेचा भडिमार करणारे काँग्रेस नेते म्हणून दिग्विजयसिंह यांची ओळख आहे. त्यांच्या अनेक वक्तव्यांवरून वादही निर्माण झाला आहे. पण गुरूवारी त्यांनी शहा यांच्या आरएसएसचं कौतूक केलं. अमित शहांनी केलेल्या मदतीचा उल्लेख करत दिग्विजयसिंह यांनी त्यांचे आभारही मानले.

दिग्विजयसिंह यांनी गुरूवारी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान हे कौतूक केलं आहे. त्यांनी 30 सप्टेंबर 2017 ते 9 एप्रिल 2018 या कालावधी नर्मदा परिक्रमा केली आहे. ही परिक्रमा 192 दिवस चालली होती. त्यावेळी दिग्विजयसिंह यांचं वय 70 वर्षे एवढं होतं. सुमारे 3300 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला होता. या परिक्रमेदरम्यान आलेले अनुभव दिग्विजयसिंह यांनी यावेळी सांगितले.

Digvijay Singh, Amit Shah
धक्कादायक : हवाई दलातील बलात्कारपीडित महिला अधिकाऱ्याचा असाही छळ

ते म्हणाले, नर्मदा परिक्रमावेळी वन विभागातील अधिकाऱ्यांनी आमची ठिकठिकाणी व्यवस्था केली होती. त्या अधिकाऱ्यांना मला सांगितले की, तुम्हाला आश्चर्य वाटेल आम्हाला केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे आदेश आहेत. दिग्विजयसिंह यांना नर्मदा परिक्रमावेळी सर्वप्रकारचे सहकार्य करावे. त्यांना कसलाही त्रास होता कामा नये, असे शहा यांनी त्या अधिकाऱ्यांना सांगितले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनीही आम्हाला सहकार्य केलं. मी नेहमी संघावर टीका करतो, पण त्यानंतरही त्यांनी मदत केली. मी अमित शहा यांचाही कट्टर विरोधक आहे. मी त्यांना कधीच भेटलो नाही. पण त्यानंतरही त्यांनी माझ्या मदतीसाठी आदेश दिले. डोंगरांमधून रस्ता तयार करून दिला. मीही त्यांचे आभार मानले, असं दिग्विजय सिंह यांनी सांगितलं.

Digvijay Singh, Amit Shah
असाही अनोखा योग : देशाची सुरक्षा दोन मराठी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर

दरम्यान, दिग्विजयसिंह यांनी एका जाहीर कार्यक्रमात शहा यांच्यासह आरएसएसचे कौतूक केल्यानं उपस्थितही हैरान झाले. कोणतीही संधी मिळताच दिग्विजयसिंह भाजप व आरएसएसवर तुटून पडतात. त्यांनी केलेली विधानं अनेकदा वाद निर्माण करतात. त्यामुळं गुरूवारी त्यांनी केलेल्या कौतुकांमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com