'आरएसएस एखाद्या वाळवीप्रमाणे'; दिग्विजय सिंहांचा भाजपवर निशाणा

दिग्विजय सिंह (Digvijay singh) यांनी योगी आदित्यनाथांच्या (Yogi Adityanath) भाषणात हिंदू-मुस्लिम, हिंदुस्थान-पाकिस्तान याशिवाय काहीही नसल्याचं ते म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.
Digvijay singh- RSS
Digvijay singh- RSS

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) एखाद्या वाळवीप्रमाणे असून वाळवी जसजशी हळूहळू संपूर्ण घर किंवा घरातील वस्तू पोखरुन उद्ध्वस्त करते, आरएसएसही तशाच प्रकारे हळूहळू आणि संपूर्ण व्यवस्थेला उद्ध्वस्त करत आहे”, अशा शब्दांत काँग्रेस (Congress) नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यावरुन आता नव्या वाद सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंदूरमध्ये (indore) बोलताना दिग्विजय सिंह (Digvijay singh) यांनी आरएसएसवर टीका केली. ( Latest national Political news)

केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी पाच राज्यांमधल्या निवडणुकांची घोषणा केली. येत्या 10 फेब्रुवारी ते 7 मार्च 2022 या कालावधीत पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला थेट वाळवीची उपमा दिली आहे.

Digvijay singh- RSS
महाविकास आघाडीला दणक्याची तयारी : सेनेच्या तीन आमदारांवर भाजपचा डोळा

मात्र, आपल्या वक्तव्यावर होणारा संभाव्य वाद लक्षात घेता लागलीच स्पष्टीकरणही दिले आहे. आपण आरएसएसला वाळवी म्हणालो नसल्याचं, त्यांनी म्हटलं आहे. मला माहिती आहे की आरएसएसची वाळवीशी तुलना केल्यामुळे माझ्यावर खूप टीका होणार आहे. पण मी आरएसएसला वाळवी म्हणालेलो नाही. संपूर्ण व्यवस्थेला हळूहळू उद्ध्वस्त करणाऱ्या आरएसएसच्या विचारसरणीला मी वाळवी म्हणालो असल्याचं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे.

याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे. 'फॅसिस्ट विचारसरणीला पुढे नेता यावे आणि त्याच्या आधारे राजकीय पदे मिळवून पैसा कमावता यावा म्हणून ‘हिंदू धर्म धोक्यात आहे’ असा अपप्रचार देशात सातत्याने केला जातो. परंतू मुस्लीम आणि ख्रिश्चनांच्या शेकडो वर्षांच्या ब्रिटीश राजवटीत भारतात कधीही हिंदू धर्माला धोका निर्माण झाला नाही, मग हिंदू धर्म आताच कसा धोक्यात येईल?' असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. सीएम योगींच्या भाषणात हिंदू-मुस्लिम, हिंदुस्थान-पाकिस्तान याशिवाय काहीही नसल्याचं ते म्हणतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com